Parbhani Accident : परभणीत बस-दुचाकींच्या अपघातात 3 तरुणांचा मृत्यू, दोन गंभीर

author img

By

Published : Mar 14, 2022, 12:00 PM IST

Parbhani Accident

रविवारची रात्र आणि सोमवार महाराष्ट्रासाठी घातवार ठरले ( Accident In Parbhani ) आहेत. मराठवाड्यातील परभणीमध्येही रविवारी मध्यरात्री अपघात ( charthana bus bike accident ) झाला. एसटी बस आणि दुचाकी यांच्या अपघातात दुचाकीवरील तीन जण ठार झाले ( jintur bus Bike accident ) आहेत, तर दोन जण जखमी झाले आहेत.

परभणी -रविवारची रात्र आणि सोमवार महाराष्ट्रासाठी घातवार ठरले ( Accident In Parbhani ) आहेत. मराठवाड्यातील परभणीमध्येही रविवारी मध्यरात्री अपघात ( charthana bus bike accident ) झाला. एसटी बस आणि दुचाकी यांच्या अपघातात दुचाकीवरील तीन जण ठार झाले ( jintur bus Bike accident ) आहेत, तर दोन जण जखमी झाले आहेत. तर सोलापूरमध्ये पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या ट्रॅक्टरला झालेल्या अपघातात चार भाविकांचा मृत्यू झाला. तर सोमवारी सकाळी बुलढाण्यात शेगावला निघालेल्या बोलेरोला ट्रकने जोरदार धडक दिली यात पाच जणांचा मृत्यू झाला.

चारठाणा येथे तिघांचा मृत्यू -

बस आणि 2 दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात होवून 3 तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे घडली आहे. या ठिकाणच्या सिंगठाणा वळण रस्त्यावर झालेल्या या अपघातात अन्य दोन जण जखमी झाले आहेत.

अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे -

अतिक तांबटकरी (वय 20), शेख अमीर (वय 18), मोहजीब शेख (वय 20) असे या अपघातात मरण पावलेल्यांची नावे आहेत. तर वसिम शेख (वय 30) आणि विखार शेख (वय 30) अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. हे सर्वजण सेलू शहरातील राज मोहल्ला येथील रहिवाशी आहेत.

वळण रस्त्यावर बसली धडक -

सेलु येथील रहिवाशी असलेले वरील 5 तरुण काल रविवारी रात्री 2 दुचाकीवर बसुन येलदरीयेथुन सेलुकडे जात होते. त्याचवेळी जिंतूर आगाराची औरंगाबादवरुन जिंतूरकडे जाणारी बस (एमएच 13 सियु 6921) सिंगठाणा वळण रस्त्यावर येताच या तिन्ही वाहनांची समोरासमोर जबरदस्त धडक बसली. यात एका मोटारसायकवरील अतिक तांबटकरी, शेख अमीर आणि मोहजीब शेख हे तिघे जागीच ठार झाले. तर दुसऱ्या मोटारसायकलवरील वसिम शेख आणि विखार शेख हे जखमी झाले. या घटनेची माहिती चारठाणा पोलीसांना मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरिक्षक बालाजी गायकवाड, सिद्धार्थ आचार्य यांनी धाव घेतली. तोपर्यंत चारठाणा प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुग्णवाहिका चालक शेख इसाक यांच्या मदतीने नागरिकांनी जखमींना जिंतूरच्या शासकीय रुग्णालयात हलविले.

हेही वाचा - Accident in Jejury Road : सोमवार ठरला घातवार! वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात 15 जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.