परभणी: कोरोनाचा संसर्ग वाढल्याने मानवत शहरात 10 दिवस 'मिनी लॉकडाऊन'

author img

By

Published : Oct 7, 2021, 3:03 AM IST

जिल्हाधिकारी आंचल गोयल

मानवतमध्ये लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मानवत नगरपरिषदेच्या हद्दीतील लोकसंख्या 32 हजार 488 असून 14,860 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर 7,535 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. अद्यापही 60 टक्के नागरिक हे लसीकरणापासून वंचित राहिले आहेत.

परभणी - मानवत शहरात मागील आठवड्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने शहरातील आठवडी बाजार, धार्मिक स्थळे, शाळा, खेळाची मैदाने आदी गर्दीची ठिकाणे दहा दिवसांसाठी बंद ठेवण्याचा (मिनी लॉकडाऊन) करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी घेतला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी गोयल यांनी आज बुधवारी मानवतच्या नगरपालिकेत बैठक घेऊन निर्बंध याबाबतच्या कडक सूचना दिल्या आहेत.

मानवत शहरात मागील आठवड्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली होती. जिल्ह्यात हा कोरोना संसर्ग वाढणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी बुधवारी मिनी लॉकडाऊनचे आदेश काढले आहेत. मानवत शहरातील आठवडी बाजार, धार्मिक स्थळे, शाळा, बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे आणि खेळाची मैदाने आदी ठिकाणे १६ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

हेही वाचा-अखेर योगी सरकार झुकलं; राहुल गांधी सीतापूरमध्ये दाखल, प्रियंकांसह लखीमपूर खेरीकडे होणार रवाना

जबाबदारीने मास्कचा वापर करा - गोयल

मानवत येथील लसीकरणाला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळावा यासाठी नगरपरिषदेच्या नगरसेवकांचे सहकार्य घेण्याचे सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला केल्या आहेत. मानवत शहर येत्या दहा दिवसात 100 टक्के कोरोना लसीकरण पुर्ण होण्यासाठी लसीकरण मोहिमेला गती द्यावी. मानवत शहरातील नागरिकांनी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता जबाबदारीने मास्कचा वापर करावा. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याला कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून दूर ठेवण्यासाठीआरोग्य विभागाने कोरोना चाचण्या व लसीकरण वाढविण्यावर भर द्यावा, अशा सुचना जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केल्या आहेत.

हेही वाचा-कर्नाटक: मुसळधार पावसाने घर कोसळले; बेळगाव जिल्ह्यात सात जणांचा मृत्यू


बैठकीला यांची होती उपस्थिती -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मानवत नगर परिषदेच्या सभागृहात या तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मानवत नगरपरिषदेचे नगराध्यक्ष एस. एम. पाटील, उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे, मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, तहसीलदार डी. डी फुपाटे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, निवासी आरोग्य अधिकारी डॉ. किशोर सुरवसे, पोलिस निरीक्षक यांच्यासह नगरसेवक व प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती.


हेही वाचा-राहुल-प्रियंका गांधींनी अखेर मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाची लखमीपूरमध्ये घेतली भेट, म्हणाले...


मानवतमध्ये 60 टक्के नागरिक लसीकरणापासून वंचित -

मानवतमध्ये लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मानवत नगरपरिषदेच्या हद्दीतील लोकसंख्या 32 हजार 488 असून 14,860 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर 7,535 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. अद्यापही 60 टक्के नागरिक हे लसीकरणापासून वंचित राहिले आहेत. आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, नागरिकांमध्ये या चाचण्याबद्दल असलेले गैरसमज दूर करुन विश्वासार्हता निर्माण होईल या दिशेने काम करावे, असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.