Mother Gives Birth In Forest : रस्त्याअभावी महिलेची जंगलातच प्रसूती; 5 किलोमीटर डोलीतून केला प्रवास

author img

By

Published : Sep 12, 2022, 11:38 AM IST

Mother Gives Birth In Forest

जव्हार तालुक्यातील ग्रामीण भाग असणाऱ्या ग्रामपंचायत, ऐना येथील मनमोहाडी गावातील 21 वर्षीय मातेची रस्ता अभावी जंगलात प्रसूती ( Mother Gives Birth In Forest ) करण्याची वेळ आली. पाच किलोमीटरचा डोलीतून प्रवास करून माता, बालकाला रुग्णाच्या नातेवाईकांनी पहाटे तीन वाजता जव्हार रुग्णालयात ( Jawar Hospital Palghar ) दाखल केले.

जव्हार ( पालघर ): देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा ( Azadi Ka Amrit Mahotsav ) करून काही महिने उलटत नाही तोच, जव्हार तालुक्यातील ग्रामीण भाग असणाऱ्या ग्रामपंचायत, ऐना येथील मनमोहाडी गावातील 21 वर्षीय मातेची रस्त्याअभावी जंगलात प्रसूती ( Mother Gives Birth In Forest ) करण्याची वेळ आली. पाच किलोमीटरचा डोलीतून प्रवास करून माता, बालकाला रुग्णाच्या नातेवाईकांनी पहाटे तीन वाजता जव्हार रुग्णालयात ( Jawar Hospital Palghar ) दाखल केले.

महिलेची जंगलातच प्रसूती

जंगलात प्रसुती - ग्रामपंचायत ऐना येथील मनमोहाडी ( Gram Panchayat Aina Manmohadi ) या गावातील गरोदर महिला अंजली राजेश पारधी, वय वर्ष 21 या मातेला रविवारी पहाटे 3 वाजेच्या दरम्यान प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या. या मातेला तिच्या नातेवाईकांनी डोलीतून 5 किलोमीटर पायपीट करत जंगलातून जात असताना मातेची वाटेतच प्रसूती करावी लागली. तीने एका मुलीला जन्म दिला दिला असून, दोघांनाही जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

रस्त्याअभावी दुरव्यावस्था - हा भाग अतिशय दुर्गम क्षेत्रात येत असून ये-जा करण्यासाठी रस्त्याची मोठ्या प्रमाणात वानवा आहे. या ठिकाणी वास्तव्य करत असलेल्या नागरिकांना आरोग्य सुविधा घ्यायची असल्यास जवळपास पाच किलोमीटरची पायपीट करावी लागते. गरोदर माता, सर्पदंश अशा रुग्णांना नेता असताना रस्त्याअभावी मोठ्या प्रमाणात जीव जोखमीत घालावा लागतो. या रस्त्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करत आहोत. शासनाकडून फॉरेस्ट परवानगीमुळे निधी देता येत नाही, असे सांगण्यात येत होते. परंतु आता आम्ही 3/2 चा प्रस्तावनुसार फॉरेस्टची परवानगी घेतली आहे. आता तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी विनंती एकनाथ दरोडा, अध्यक्ष बहुजन विकास आघाडी यांनी केली आहे.

रविवारी पहाटे अंजली राजेश पारधी या 21 वर्षीय प्रसूत महिला व त्यांची कन्या यांना जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून माता नवजात अर्भक या दोहोंची प्रकृती चांगली आहे. - डॉ.रामदास मराड , वैद्यकीय अधीक्षक, पतंग शहा उपजिल्हा रुग्णालय जव्हार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.