Firecrackers on Teachers Gate : विरारमध्ये शिक्षिकेच्या गेटवर अज्ञातांनी फोडले फटाके, अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

author img

By

Published : Nov 28, 2022, 8:08 PM IST

Etv Bharat

जिल्ह्यातील विरारमध्ये एका महिला शिक्षिकेच्या घराबाहेर रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी फटाके फोडले ( Firecrackers on Teachers Gate ). सदर घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालघर - जिल्ह्यातील विरारमध्ये एका महिला शिक्षिकेच्या घराबाहेर रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी फटाके फोडून (Firecrackers on Teachers Gate ) दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्यरात्री फोडले फटाके - विरार पश्चिम, सत्पाळा राजोडी चार रस्ता येथे राहणाऱ्या जेनेट बावतीस लोपीस या शिक्षिकेच्या ग्रीन पार्क या घरी मध्यरात्रीच्या सुमारास त्या, त्यांची मुलगी व वृद्ध आईसोबत घरात झोपले होते. दरम्यान यावेळी अज्ञात तरुणांनी त्यांच्या घराच्या गेटवर तीन वेळा थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने फटाके फोडले.

विरारमध्ये शिक्षिकेच्या गेटवर अज्ञातांनी फोडले फटाके

पोलिसात तक्रार दाखल - सदर घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरातही केली असून या घटनेनंतर जेनेट लोपीस यांचे कुटुंबीय भयभीत झाली असून मानसिक तणावत आहे. तीन दुचाकी व एका सायकलवरून आलेल्या दहा जणांच्या टोळक्याने हा फटाक्यांचा स्फोट घडविल्याचे सिसिटीव्ही दृश्यांमध्ये दिसून येत आहे. अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.