मुरबे येथील मच्छिमारांना मिळाले 157 घोळ मासे; विक्रीतून 1 कोटी 25 लाखांची कमाई

author img

By

Published : Aug 31, 2021, 6:36 PM IST

palghar

घोळ माश्याच्या पिशवीचा एक उपयोग म्हणजे त्यांच्यापासून शस्त्रक्रियेत वापरले जाणारे सुचर्स किंवा धागे हे जखम शिवण्यासाठी वापरले जातात. हॉंगकाँग, मलेशिया, थायलंड, चीन आदी देशात या भोताला मोठी किंमत मिळते. सौंदर्यप्रसाधने, औषधे, शस्त्रक्रिया दरम्यान लागणार धागा बनवणे यासाठी वापर करण्यात येतो.

पालघर - मुरबे येथील हरबा देवी ही मासेमारी बोट समुद्रात मासेमारीला गेली असता त्यांच्या जाळ्यात 157 घोळ मासे सापडले. या माश्याचे मांस आणि त्याच्या पोटातील बोथ (पोटातील पिशवी- ब्लेडर) यांच्या विक्रीतून मच्छिमारांना सुमारे 1 कोटी 25 लाखाची रक्कम मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

1 कोटी 25 लाखांची कमाई

पालघर तालुक्यातील मुरबे येथील चंद्रकांत तरे आणि त्याचे अन्य आठ सहकाऱ्यांसह 28 ऑगस्ट रोजी आपली बोट मासेमारीसाठी घेऊन रवाना झाले. डहाणू-वाढवण येथील समुद्रात साधारणपणे 20 ते 25 नॉटिकल समुद्रात हरबा देवी बोटीतून समुद्रात जाळी टाकण्यात आली. समुद्रात सोडल्यावर काही तासाच्या प्रतिक्षेनंतर बोटीतील मच्छीमारांनी समुद्रात सोडलेली आपली जाळी बोटीत घेण्यास सुरुवात केली. त्या जाळ्यामध्ये एकूण 157 घोळ आणि दाढे मासे सापडल्याने त्यांचे नशीब फळफळले. प्रत्येकी सुमारे 12 किलो ते 25 किलो वजनाचे हे घोळ मासे असल्याचे कळते.

palghar
मच्छिमारांना मिळाले 157 घोळ मासे
1 कोटी 25 लाखांची बोली उत्तर प्रदेश, बिहार येथून आलेल्या परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून या बोथाची लिलावाद्वारे खरेदी केली जाते. सर्वात जास्त बोली लावणारा आणि पैश्याची हमी देणाऱ्या व्यापाऱ्यांची निवड विक्री दरम्यान केली जाते. सर्व प्रथम शुक्रवारी सातपाटी येथे भोताचा लिलाव एका व्यापाऱ्याच्या कमी किमतीच्या बोलीने अयशस्वी झाला. त्यानंतर रविवारी मुरबे येथे 15 ते 20 व्यापाराच्या उपस्थितीत लिलाव पार पडला. यावेळी 1 कोटी 25 लाखाची उच्चतम बोली लागल्याची माहिती समोर आली आहे. तर घोळ माश्याचे मासे 300 ते 350 रुपये प्रतिकिलो दराने स्थानिक व्यापाऱ्यांनी खरेदी केल्याचे कळते. घोळ माशाच्या बोथला मोठी मागणी घोळ माश्याच्या पोटात असलेल्या बोथाला मोठी किंमत असून नर घोळ माश्याच्या पोटात असलेल्या बोथ (पिशवी) माद्यांच्या पिशवीपेक्षा जास्त दर्जेदार असतात. त्यामुळे नर जातीच्या बोथाला व्यापाऱ्यांकडून मोठी किंमत मिळते. घोळ माश्याचे बोथ खरेदी केल्यानंतर खूपच नाजूक रित्या या भोतावर स्वच्छ करण्याची प्रक्रिया केली जाते. लहान बाळाची ज्या पद्धतीने काळजी घेतली जाते त्याच धर्तीवर प्रत्येक भोताची काळजी घेताना त्या भोता मधील रक्तपेशी वेगळ्या करून एका बंद खोलीत मोठ्या काचेच्या बल्बच्या प्रकाशात सुकवले जातात. घोळ माश्याच्या पिशवीचा एक उपयोग म्हणजे त्यांच्यापासून शस्त्रक्रियेत वापरले जाणारे सुचर्स किंवा धागे हे जखम शिवण्यासाठी वापरले जातात. हॉंगकाँग, मलेशिया, थायलंड, चीन आदी देशात या भोताला मोठी किंमत मिळते. सौंदर्यप्रसाधने, औषधे, शस्त्रक्रिया दरम्यान लागणार धागा बनवणे यासाठी वापर करण्यात येतो.

हेही वाचा - उद्यापासून (1 सप्टेंबर) EPF, बॅंक, LPG, OTT, रेशन कार्डच्या या नियमांमध्ये होणार बदल, असा होईल तुमच्यावर परिणाम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.