'त्या' सुटकेसमधील मृतदेहाची ओळख पटली; वसई पोलिसांकडून पतीला अटक

author img

By

Published : Sep 18, 2022, 10:58 PM IST

Updated : Sep 19, 2022, 7:08 AM IST

सुटकेसमधील मृतदेहाची ओळख पटली;वसई पोलिसांकडून पतीला अटक

मागील वर्षी भुईगाव समुद्रकिनार्‍यावरील सुटकेसमध्ये शीर आढळलेल्या महिलेच्या हत्येप्रकरणाचा छडा लावण्यात वसई पोलिसांना यश आले आहे. शीर नसलेला हा मृतदेह नालासोपारा येथील सानिया शेख या २५ वर्षीय विवाहित महिलेचा आहे. तिच्या हत्येप्रकरणी तिच्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

वसई (पालघर) - मागील वर्षी २६ जुलै २०१२ रोजी वसईच्या भुईगाव समुद्रकिनार्‍यावर एका सुटकेसमध्ये पोलिसांना एका महिलेचे शीर नसलेल्या धडाचा मृतदेह आढळळा होता. शीर नसल्याने या मृतदेहाची ओळख पटवता येत नव्हती. त्यामुळे हा मृतदेह कुणाचा याचे गूढ उकलले नव्हते. पोलिसांनी विशेष पथके बनवून या हत्या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. पोलिसांनी सर्व पोलीस ठाण्यातील बेपत्ता महिलांच्या नोंदी देखील तपासल्या होत्या. मात्र, या महिलेची ओळख पटत नव्हती.

माहिती देताना पोलीस अधिकारी

सानियाचा पती आसिफ शेख याला अटक - दरम्यान, २९ ऑगस्ट २०२२ रोजी आचोळे पोलीस ठाण्यात सानिया शेख (२५) ही महिला बेपत्ता असल्याची तक्रारी तिच्या पालकांनी दिली होती. तिचे पालक बेळगाववरून मुलीचा शोध घेत आले होते. त्यामुळे सुटकेस मधील सानियाचा असल्याचा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी मृतदेहाच्या डीएनचे नुमनुे आणि मयत सानियाच्याच्या ३ वर्षांच्या मुलीचे डीएनए तपासणीसाठी पाठवले असता हा मृतदेह सानियचाच असल्याचे स्पष्ट झाले. पत्नीची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी सानियाचा पती आसिफ शेख याला अटक केली.

सानिया बेपत्ता असल्याचा रचला बनाव - याबाबत माहिती देताना वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक कल्याणराव कर्पे यांनी सांगितले की, मूळ बेळगावच्या असेलल्या सानियाचे नालासोपारा येथे राहणार्‍या आसिफ शेख यांच्याशी लग्न झाले होते. चारित्र्याच्या संशयावरून पतीने सानियाची हत्या केली आणि मृतदेह सुटकेसमध्ये टाकून दिला. दरम्यान, सानियाच्या नावाने एक बनावट चिठ्ठी लिहीली. मी घर सोडून जात आहे, माझा शोध घेऊ नये असा मजकूर त्यात होता. ती बेपत्ता असल्याचे त्याने भासवले आणि नालासोपारा सोडून मुंब्रा येथे रहायला गेला.

सात दिवसांची पोलीस कोठडी - पुढे तिच्या आई वडिलांना देखील त्याने सानिया घर सोडून गेल्याची थाप मारली होती. तिला शोधत तिचे पालक नालासोपारामध्ये आले आणि त्यांनी तक्रार दाखल केली. आरोपी आसिफने पोलिसांमध्ये ती बेपत्ता असल्याची माहिती दिली नव्हती. तसेच, नालासोपारा येथील राहते घर बदलले होते. त्यामुळे तिची ओळख पटू शकली नव्हती, असे कर्पे यांनी सांगितले. त्याने शीर कुठे टाकले आणि नेमकी हत्या कशी केली याचा पोलीस तपास करत आहेत. आरोपी आसिफ याला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Last Updated :Sep 19, 2022, 7:08 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.