Suicide: पत्नी घर सोडून गेल्याने पतीची गळफास घेऊन आत्महत्या, पालघरमधील घटना

author img

By

Published : Nov 19, 2022, 10:33 PM IST

Suicide

पत्नी घर सोडून गेल्याने पतीची गळफास घेऊन आत्महत्या, (Husband commits suicide) पालघरमधील घटना. बोईसर येथील शिवाजी नगर जुनी वस्तीत राहणारा एका ३५ वर्षीय इसमाने बायको घर सोडून गावी गेल्याने पंख्याला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.

पालघर: पत्नी घर सोडून गेल्याने पतीची गळफास घेऊन आत्महत्या, (Husband commits suicide) पालघरमधील घटना. बोईसर येथील शिवाजी नगर जुनी वस्तीत राहणारा एका ३५ वर्षीय इसमाने बायको घर सोडून गावी गेल्याने पंख्याला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.

मयत इसमाचे नाव सोनू सुरेश सिंग असे आहे. मूळ रहिवासी बिहारचा असून तो शिवाजी नगर जुनी वस्तीत आपल्या बायको आणि लहान मुलीसोबत राहत होता. गुरुवारी सोनू सिंग हा रात्र पाळीत कामावर गेल्यावर, इकडे बायको आपल्या मुलीला घेऊन अवध एक्स्प्रेसने रात्री निघून गेली. सकाळी सोनू सिंग कामावरून घरी आल्यानंतर त्याला समजले की बायको रात्रीच घर सोडून निघून गेली आहे. बायकोवर त्याचे खूप प्रेम होते.ती निघून गेल्यावर त्याला तिच्या विरह सहन न झाल्याने त्याने घरातील पंख्याला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून शव विच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला आहे. घटनेची माहिती मयत सोनू सिंग यांच्या आईवडिलांना देण्यात आली आहे. मिळालेल्या माहिती नुसार सोनू सिंग याचे त्याच्या बायको सोबत नेहमीच भांडण होत असे. त्यामुळे त्याची बायको त्याला सोडून निघून गेली असल्याचे समजले आहे. सोनू सिंग याने या अगोदर पण आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यावेळी स्थानिकांनी त्याला वाचविले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.