Young Man Died : नालासोपाऱ्यात उघड्या गटारात पडून तरूणाचा मृत्यू

author img

By

Published : Nov 23, 2022, 5:20 PM IST

Etv Bharat

नालासोपारा पूर्वेच्या एव्हर शाईन परिसरातील पार्वती अपार्टमेंटमध्ये राहणारा ऋषभ कामानिमित्त सोमवारी दुपारी बाहेर गेला होता. रात्री घरी परतत असताना इमारतीच्या बाजूलाच असलेल्या फूटपाथवर चालत असताना अंधारात तोल जाऊन तो गटारात पडला आणि त्याचा बडून मृत्यू ( died due falling into open drain ) झाला.

पालघर : नालासोपारा पूर्वेच्या एव्हर शाईन परिसरातील उघड्या गटारात पडून २५ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची ( died due falling into open drain ) घटना उघडकीस आली आहे. ऋषभ सरकार असे या मयत तरुणाचे नाव असून या अपघाती मृत्यूची नोंद आचोळे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

नालासोपाऱ्यात उघड्या गटारात पडून तरूणाचा मृत्यू

उघड्या गटारात पडून मृत्यू - एव्हर शाईन परिसरातील पार्वती अपार्टमेंटमध्ये राहणारा ऋषभ कामानिमित्त सोमवारी दुपारी बाहेर गेला होता. रात्री घरी परतत असताना इमारतीच्या बाजूलाच असलेल्या फूटपाथवर चालत असताना अंधारात तोल जाऊन तो गटारात पडला आणि त्याचा बडून मृत्यू झाला.

परदेशी नोकरीचे स्वप्न अपूर्ण - ऋषभ हा आपल्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. तो जानेवारी महिन्यात परदेशात नोकरीसाठी जाणार होता. मात्र वडिलांना कर्करोग असल्याने त्यांच्या उपचारासाठी तो घरातून काम करत होता. पण त्याचा अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे.

नागरिकांचा संताप - पालिकेने पावसाळ्यात सर्व उघडी गटारे बंदिस्त केल्याचा दावा केला होता. मात्र सलग महिनाभरात दोन जणांना उघड्या गटारात आपला जीव गमवावा लागला असल्याने पालिकेच्या कारभाराविरोधात नागरिक संताप व्यक्त करीत आहेत..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.