शिवराज राक्षे दुसऱ्यांदा बनला महाराष्ट्र केसरी; हर्षवर्धन सदगीर याच्यावर केली मात

शिवराज राक्षे दुसऱ्यांदा बनला महाराष्ट्र केसरी; हर्षवर्धन सदगीर याच्यावर केली मात
Maharashtra Kesari 2023 : शिवराज राक्षे Shivraj Rakshe हा 65 व्या वरिष्ठ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मानकरी ठरला आहे. शिवराज राक्षे याने हर्षवर्धन सदगीर यास 6-0 अशी एकतर्फी मात देऊन 'महाराष्ट्र केसरी किताब' पटकावला आहे. तर सामान्यांच्या 1.42 व्या मिनिटाला हर्षवर्धन सदगीर (Harshvardhan Sadgir) याच्या उजव्या हाताला झटका बसला तरीही तो मोठ्या जोशात ही कुस्ती खेळला.
धाराशिव Maharashtra Kesari 2023 : शिवराज राक्षेने 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवर स्वतःचं नाव कोरलं आहे. महाराष्ट्र केसरी किताबाचा राक्षे दुसऱ्यांदा मानकरी ठरला आहे. शिवराज राक्षे आणि हर्षवर्धन सदगीर या दोघात महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत झाली. अत्यंत अटीतटीच्या लढतीत राक्षे याने हर्षवर्धन सादगीरला (Harshvardhan Sadgir) धुळ चारत मानाची गदा पटकावली आहे.
श्री तुळजभवानी स्टेडियमवर पार पडली स्पर्धा : 17 नोव्हेंबर पासून धारशिवच्या श्री तुळजाभवानी स्टेडियमवर (Shree Tuljabhavani Stadium) गुरुवर्य के. टी पाटील क्रीडानगरीत या स्पर्धा पार पडल्या. राज्यातील 950 पैलवानांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद धाराशिव तालीम संघ आणि आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाने आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत विजयी पैलवनाला तीस लाख किंमत असलेली स्कॉर्पिओ चांदीची गदा आणि रोख रक्कम देण्यात आली, तर उपविजेत्या पैलवनाला ट्रॅक्टर आणि चांदीची गदा, रोख रक्कम देण्यात आली.
शिवराज राक्षे दिलं पारितोषक : यावेळी कळंब-धाराशिवचे आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बसे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, आयोजक सुधीर अण्णा पाटील, अभिराम पतील आणि आदित्य पाटील यांच्या हस्ते शिवराज राक्षे यांना पारितोषक देण्यात आले. यावेळी ऑलम्पिक कांस्यपदक विजेता योगेश्वर दत्त, अर्जुन पुरस्कारप्राप्त काकासाहेब पवार, महाराष्ट्र केसरी राहुल आवारे, डॉ. धावलसिह मोहिते पाटील, माजी खासदार रवींद्र गायकवाड, संजय दुधगावकर, अनिल खोचरे, धनंजय सावंत, महेंद्र धुरगुडे, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे बाळासाहेब लांडगे, उपाध्यक्ष विजय बराटे, विभागीय सचिव वामनराव गाते आदीसह मोठ्या संख्येने प्रेषक यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा -
