Achievements75 ग्रामीण भागातील महिलांची भरारी, 21 प्रकारच्या भाज्यांनी बनवलेल्या शेवयांतून लाखोंची उलाढाल

author img

By

Published : Aug 11, 2022, 5:15 PM IST

Osmanabad Women  Business

उस्मानाबाद ( Osmanabad City ) जिल्ह्यातील गंजोटी येथील महिलांनी सेंद्रिय भाजीपाल्यापासून पोषणमूल्य असलेल्या शेवया तयार करून विक्री ( Gunjoti women food business story ) करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. या शेवयाला आता मागणी वाढू लागली आहे. या महिला वर्षाला 7 लाखांची कमाई करत आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या ( Maharashtra State Rural Development Mission ) माध्यमातून या महिलांना प्रशिक्षण आणि आर्थिक मदत केली जात आहे.

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील गंजोटी येथील महिलांनी सेंद्रिय भाजीपाल्यापासून पोषणमूल्य असलेल्या शेवया तयार करून विक्री ( Gunjoti women food business story ) करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. या शेवयाला आता मागणी वाढू लागली आहे. या महिला वर्षाला 7 लाखांची कमाई करत आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून ( Maharashtra State Rural Development Mission ) या महिलांना प्रशिक्षण आणि आर्थिक मदत केली जात आहे. ग्रामीण भागातील महिला विविध योजनांचा लाभ घेत व्यवसायात भरारी घेत आहेत. उमरगा तालुक्यातील गुंजोटी गावातील महिलानी एक नव्हे तर 21 प्रकारच्या पौष्टिकमूल्य असलेल्या शेवया तयार करून विक्री करण्याचा उद्योग सुरू केला आहे. या शेवयाची मागणी वाढत असून वर्षाकाठी या महिला 7 लाखांचे उत्पन्न मिळवत आहे.

मॅगीसारख्या फास्टफूडला पर्याय, पौष्टिक शेवया - फास्टफूडमुळे अनेकांना आरोग्याबाबतच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील गंजोटी येथील महिलांनी सेंद्रिय भाजीपाल्यापासून पोषणमूल्य असलेल्या शेवया तयार करून विक्री ( Gunjoti women food business story ) करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. या शेवयाला आता मागणी वाढू लागली आहे. या महिला वर्षाला 7 लाखांची कमाई मिळवित आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प ( National Rural Economic Transformation Project ) आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून या महिलांना प्रशिक्षण आणि आर्थिक मदत केली जात आहे. 'प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उन्नयन उद्योग योजना ' तसेच 'सही पोषण देश रोशन'अंतर्गत व्यवसाय करण्यात येत ( Nutrition food for women and girls ) आहे.

इतर राज्यातदेखील शेवयांची मागणी - सर्वसामान्यपणे लहान मुले भाजीपाला खाण्यास टाळतात. त्यामुळे या महिलांनी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाज्यांचा फ्लेवर तयार करून त्यापासून या पोषणमूल्य असलेल्या शेवया विक्रीसाठी बाजारात आणल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या 'सही पोषण देश रोशन' या अभियानाच्या माध्यमातून पोषणमूल्य असलेलं अन्न गर्भवती महिला किशोरी मुली आणि लहान मुलांना मिळावे म्हणून ( women run food business by saling Seviyans ) हा व्यवसाय निवडला आहे. या शेवयाची मागणी वाढत आहे उस्मानाबाद जिल्ह्यासह सोलापूर, लातूर, हैद्राबाद तसेच पुण्याच्या काही मॉलमधून या शेवयाची विक्री होत आहे.

विविध फ्लेवरमध्ये शेवया उपलब्ध - 15 हजार गुंतवणूकीपासून सुरू झालेला हा व्यवसाय महिन्याला 30 हजार रुपये मिळवून देऊ लागला आहे.विशेष म्हणजे या शेवयातील पोषणमूल्य 11 महिने टिकून राहतात. या शेवयामध्ये शेवगा, फ्लेवर, पालक, मेथी, नाचणी, सोयाबीन, गहु, सोजीरवा, चॉकलेट, बटरस्कॉच, व्हेनीला, पाइनापल, केवी, दूध, बाजरी, मँगो, ब्लॅकओट्स, शुगर फ्री नुडल्स, रोस्टेड आणि मिक्स फ्लेवरमध्ये शेवया उपलब्ध आहेत.

हेही वाचा : Achievements75 भारतातील टॉप 5 महिला उद्योजिका, वाचा प्रेरणादायी यशोगाथा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.