Police Arrest Groom: बोहल्यावर चढण्याऐवजी नवरदेव पोहचला पोलीस ठाण्यात, वऱ्हाडी मंडळींचा झाला हिरमोड
Published: May 22, 2023, 10:16 PM


Police Arrest Groom: बोहल्यावर चढण्याऐवजी नवरदेव पोहचला पोलीस ठाण्यात, वऱ्हाडी मंडळींचा झाला हिरमोड
Published: May 22, 2023, 10:16 PM
विवाह होणार तोच पोलिस मिरवणुकीत दाखल झाले. महिलेवर सलग चार वर्ष लैंगिक अत्याचार करून तिला फसवून दुसऱ्या युवतीशी लग्न करणाऱ्या नवरदेवाची वरात, थेट पोलीस ठाण्यात नेण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात संशयित नवरदेवा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक: नाशिक येथे नवरदेवाला बोहल्यावर चढण्याऐवजी पोलिस स्टेशनची पायरी चढण्याची वेळ आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी पंकज कदम (राहणार देवळाली गाव नाशिकरोड) यांनी फिर्यादी पीडित महिलेच्या ओळखीचा फायदा घेऊन 4 एप्रिल 2019 ते 18 मे 2023 या कालावधीत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, दरम्यान पंकज कदम याचा राहाता येथील उच्चशिक्षित मुलीशी विवाह ठरला होता.
अनेकदा लैंगिक अत्याचार: नवरदेव हा वराडी मंडळी सह नाशिकरोड येथून राहता येथे दाखल झाला होता. विवाह सोहळ्याची तयारी झाली होती, डीजेच्या तालावर नवरदेवाची मिरवणूक ही निघाली. दरम्यान फिर्यादी पीडित महिला लग्न स्थळी दाखल झाली. आमचे प्रेम संबंध आहे, लग्नाचे आमिष दाखवून पंकज कदम याने अनेकदा लैंगिक अत्याचार करत माझी फसवणूक केली आहे. अशी तक्रार राहता पोलिस ठाण्यात दिली, पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत संशयित नवरदेव पंकज याला ताब्यात घेतले.
बोहल्यावरून थेट पोलीस ठाण्यात: सात फेरे होण्यास काही मिनिटाचा अवधी असतानाच पंकजला राहता पोलीस यांनी ताब्यात घेतल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. लग्नासाठी आलेल्या वधू-वरांकडील वऱ्हाडी मध्ये एकच गोंधळ उडाला. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून राहता पोलिसांनी मिरवणुकीतून नवरदेवाला थेट पोलीस ठाण्यात आणले. बोहल्यावर चढण्याऐवजी नवरदेवाला पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली. त्यामुळे वऱ्हाडी मंडळींचा हिरमोड झाला. याप्रकरणी प्रथम राहता पोलीस ठाण्यात महिलेवर चार वर्ष लैंगिक अत्याचार करणाऱ्या पंकज कदम विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर तो गुन्हा नाशिकरोड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
हेही वाचा -
- Child Marriage मुली मोठ्या झाल्यावर जाड्या होतात म्हणून आम्ही लवकर लग्न करतो बालविवाह रोखण्यात ग्रामसेविकेला यश
- Nashik News मनमाड रेल्वेस्थानकावरील थरारक घटना तरुणांची धावत्या रेल्वेवर उडी व्हिडीओ व्हायरल
- Income Tax Raid Nashik नाशिकमध्ये सातहून अधिक बांधकाम व्यवसायिकांवर आयकर विभागाची छापेमारी 3 हजार 333 कोटींचा बेहिशेबी व्यवहार उघड
