पितृपक्षात भाज्या कडाडल्या : गवार 160 तर वांगी 80 रुपये किलो

author img

By

Published : Sep 23, 2021, 12:32 PM IST

पितृपक्षात भाज्या कडाडल्या

गणेशोत्सवानंतर पितृपक्षाला सुरुवात होत नाही तोच भाजीपाल्यांचे भाव वाढले आहे. काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने तसेच नंतर उन्हाची तीव्रता वाढल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. परिणामी आता बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने मोठ्या प्रमाणत भाजीपाल्यांचे भाव वाढले आहे.

नाशिक - जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या संततधार पावसामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने ऐन पितृपक्षात भाजीपाल्यांचे भाव कडाडले आहे. त्यामुळे ग्राहकांना जादा दराने भाजीपाला खरेदी करावा लागत आहे.

गणेशोत्सवानंतर पितृपक्षाला सुरुवात होत नाही तोच भाजीपाल्यांचे भाव वाढले आहे. काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने तसेच नंतर उन्हाची तीव्रता वाढल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. परिणामी आता बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने मोठ्या प्रमाणत भाजीपाल्यांचे भाव वाढले आहे. पितृक्षात भाजीपाल्यांना महत्व आल्याने मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांना जादा दराने भाजीपाला खरेदी करावा लागत आहे.

गवार 160 तर वांगी 80 रुपये किलो

मागणी वाढल्याने दरात वाढ -

सध्या पितृ पंधरवडा असल्याने भाजीपाल्यांची मागणी वाढली आहे. तसेच पावसामुळे भाजीपाला खराब झाल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने अनेक भाज्यांचे भाव वाढले आहे. मात्र असे असले तरी कमी प्रमाणात का होईना ग्राहक भाजीपाला खरेदी करत असल्याचे भाजीपाला विक्रेते सांगतात.

फळभाज्यांना विशेष महत्त्व -

आम्ही नेहमी जेवणात पालेभाज्या फळभज्यांचा वापर करतो. आता पितृपक्ष देखील सुरू असून गवार, भेंडी, वांगे भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. मात्र भाज्यांचे भाव वाढल्याने कमी प्रमाणत का होईना आम्ही भाजीपाला खरेदी करतोय असे एका गृहिणीने सांगितले आहे.

भाजीपाल्यांचे भाव अशी आहेत -

  • गवार -160 रुपये किलो
  • गिलके -80 रुपये किलो
  • दोडके- 60 रुपये किलो
  • भेंडी-60 रुपये किलो
  • मेथी- 40 रुपये जुडी
  • डांगर-50 रुपये किलो
  • कारले-50 रुपये किलो
  • चवळी-60 रुपये किलो
  • काकडी- 35 रुपये किलो
  • आळू- 30 रुपये जुडी
  • चक्की-80 रुपये किलो
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.