NIA Raids : टेरर फंडिंग प्रकरणी एनआयएची कारवाई; मालेगावमधून एकाला अटक

author img

By

Published : Sep 22, 2022, 12:44 PM IST

Saifi Rahman

आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या दहशतवादविरोधी ऑपरेशनमध्ये, एनआयएने दहशतवादाशी संबंधित कारवायांमध्ये सामील (people involved in terror related activities ) असलेल्या लोकांच्या परिसराची देशभरात झडती ( NIA conducting searches nationwide ) घेतली. मालेगाव मध्ये एटीएस टीमने सैफी रहमान याला ताब्यात घेतले.

नाशिक : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ( Popular Front of India ) कार्यालयावर देशभरात छापेमारीच्या घटना समोर येत असून आज पहाटे 3 वाजता मालेगाव मध्ये सुद्धा एटीएस टीमने सैफी रहमान याला ताब्यात घेतले. मुस्लिम संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटने कडून अनेक संशयास्पद घटनांचा धोका असल्याचा अलर्ट आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.


या ठिकाणी छापीमारी सुरू : महाराष्ट्रात नवी मुंबई, पुणे, भिवंडी या ठिकाणी सुद्धा ही छापीमारी सुरू असून, मालेगाव मधून एटीएसने एकाला ताब्यात घेतल आहे. या छापीमारी बाबत अत्यंत गोपीनियता बाळगली जात असून, त्यामुळे अधिकृत माहिती अद्याप पुढे आलेली नाही. दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्या प्रकरणी ही छापीमारी सुरू असल्याचे बोलले जात आहे.

NIA चा सर्वात मोठा छापा - अधिका-यांनी सांगितले की छाप्यादरम्यान NIA, ED ने दहशतवाद्यांना समर्थन केल्याच्या आरोपाखाली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ( Popular Front of India ) च्या 100 हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. अधिकार्‍यांच्या मते, हे छापे प्रामुख्याने दक्षिण भारतात टाकले जात आहेत. एनआयएने याला “आतापर्यंतची सर्वात मोठी तपास कारवाई म्हटले आहे. एनआयएने सांगितले की, दहशतवाद्यांना कथितपणे निधी पुरवणे, त्यांच्यासाठी प्रशिक्षणाची व्यवस्था करणे, प्रतिबंधित संघटनांमध्ये सामील होण्यासाठी लोकांना फसवणे यात गुंतलेल्यांच्या छुप्या ठिकाणांवर छापे टाकले जात आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.