Nashik Kumar Vishwas Program: मराठी भाषिकांना प्रवेश नाकारल्यानं...नाशिकमध्ये कुमार विश्वास यांचा कार्यक्रम पडला बंद

Nashik Kumar Vishwas Program: मराठी भाषिकांना प्रवेश नाकारल्यानं...नाशिकमध्ये कुमार विश्वास यांचा कार्यक्रम पडला बंद
Nashik Kumar Vishwas Program : आजही मराठी भाषिकांसोबत दुजाभाव होत असल्याचं पाहायला मिळतंय. नाशिकमधून अशीच एक घटना समोर आलीय. मराठी भाषिकांना प्रवेश नाकारल्यानं कुमार विश्वास यांचा कार्यक्रम बंद पडल्याची घटना घडलीय. त्याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
नाशिक Nashik Kumar Vishwas program : नाशिकमध्ये हिंदी भाषा दिनानिमित्त हिंदी प्रसारणी सभेच्या वतीनं कुमार विश्वास यांच्या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमादरम्यान मराठी भाषिकांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळं प्रेक्षकांनी हा कार्यक्रम बंद पाडला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर या वादावर पडदा पडलाय.
मराठी रसिकांना प्रवेश नाकारला : नाशिकमध्ये हिंदी भाषा दिनानिमित्त कालिदास कला मंदिरात हिंदी प्रसारणी सभेच्या वतीनं प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांच्या कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी शहरभर आयोजकांच्या वतीनं होर्डिंग लावण्यात आले होते. अशात कार्यक्रमस्थळी रसिक प्रेक्षकांची गर्दी झालीय. त्यामुळं आयोजकांनी हा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी असल्याचं सांगत मराठी रसिकांना प्रवेश नाकारला. हा मराठी भाषिकांचा अपमान आहे, असं म्हणत मराठी भाषिकांनी घोषणाबाजी करत कार्यक्रम बंद पाडलाय. आयोजकांच्या वतीनं मराठी भाषिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. मात्र, तरीसुद्धा घोषणाबाजी सुरूच असल्यानं अखेर पोलिसांना पाचरण करण्यात आलंय. पोलिसांनी यावेळी मराठी भाषिकांची समजूत काढल्यानंतर हा कार्यक्रम सुरू झालाय.
मराठी भाषिकांचा अपमान : प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांच्या कार्यक्रम कालिदास कला मंदिरात होणार आहे. याबाबत शहरभर होर्डिंग लावण्यात आले होते. त्यावर कुठल्याही प्रकारे पास किंवा निमंत्रितांसाठी असा उल्लेख नव्हता. त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम बघण्यासाठी आलो. मात्र, या ठिकाणी आम्हाला गेटवर अडवण्यात आलं आणि आम्हाला प्रवेश नाकारला. जर हा कार्यक्रम फक्त आमंत्रितांसाठी होता, मग शहरभर होर्डिंग का लावले? हा मराठी भाषिकांचा अपमान आहे, असं मराठी रसिक प्रेक्षकांनी सांगितलं.
कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठी : दरवर्षी आम्ही हिंदी भाषा दिनानिमित्त हिंदी प्रसारणी सभेच्या वतीनं वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करत असतो. यंदा प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांच्या कार्यक्रमाचं आयोजन शहरातील कालिदास कला मंदिर येथे केलं होतं. मात्र, हा कार्यक्रम फक्त आम्ही निमंत्रितांसाठी ठेवला होता. आसन क्षमता मर्यादित असल्यानं आम्ही पासेसचं वाटप केलं होतं. त्यामुळे हा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी होता. त्यात मराठी भाषिकांचा अपमान करण्याचा आमचा कुठलाही हेतू नव्हता, असं आयोजकांनी सांगितलंय.
हेही वाचा :
- National Hindi language day - आज राट्रीय हिंदी भाषा दिन, पहा ईटीव्ही भारत'चा हा खास रिपोर्ट
- Hindi Diwas २०२३ : 'हिंदी दिवस' का साजरा केला जातो, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
- Smart Pit Poets Conference Nashik नाशिकमध्ये रंगला स्मार्ट खड्डे कवी संमेलन, महापालिका प्रशासनाच्या कारभारावर ओढले संतप्त ताशेरे
