Saptshringi Devi Mata : हजारो वर्षांनी समोर आले सप्तशृंगी मातेचे विलोभनीय रूप ; जाणून घ्या मातेची पौराणिक कथा...

author img

By

Published : Sep 14, 2022, 3:32 PM IST

Saptshringi Devi Mata

सप्तशृंगी मातेच्या सव्वा फूट मूर्तीवर वर्षानुवर्ष असलेल्या शेंदूर, लाख, मेण आदी तब्बल 1100 किलो काढल्यानंतर मूळ स्वरुप समोर removing 1100 kg of hemlock of Saptshringi Devi आलं. हे मूळ स्वरुप इतकं विलोभनीय की मूर्ती एका दृष्टीक्षेपात डोळ्यात साठवणं केवळ अशक्य आहे. आता आदिशक्तीचे मूळ स्वरुप बघण्यासाठी भाविकांचे डोळे आतुर झाले original form of mata came forward आहेत.

नाशिक : सप्तशृंगी मातेच्या सव्वा फूट मूर्तीवर वर्षानुवर्ष असलेल्या शेंदूर, लाख, मेण आदी तब्बल 1100 किलो काढल्यानंतर मूळ स्वरुप समोर ( removing 1100 kg of hemlock of Saptshringi Devi ) आलं. हे मूळ स्वरुप इतकं विलोभनीय की मूर्ती एका दृष्टीक्षेपात डोळ्यात साठवणं केवळ अशक्य आहे. आता आदिशक्तीचे मूळ स्वरुप बघण्यासाठी भाविकांचे डोळे आतुर झाले ( original form of mata came forward ) आहेत.

देवी मातेच्या मूर्तीवरून 1100 किलो शेंदूर काढल्यानंतर मातेचे मूळ रूप समोर प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा म्हणून नाशिकची ओळख आहे. नाशिकला धार्मिक पौराणिक महत्त्व असून, त्र्यंबक महाराज आणि सप्तश्रृंगी देवी माता हे देशभर मान्यता पावलेली स्थाने इथल्या लौकीकात भर घालतात. आता देवी मातेच्या मूर्तीवरून 1100 किलो शेंदूर काढल्यानंतर मातेचे मूळ रूप समोर आल्याची बातमी देशभर वाऱ्यासारखी पसरली आहे. आता आदिशक्तीच मूळ स्वरुप बघण्यासाठी भाविकांचे डोळे आतुर झाले ( original form of Saptshringi Devi Mata ) आहेत. यामुळे पुढील काही दिवसात संत महात्म्यांची आणि भविकांची पावलं सप्तश्रृंग गडाकडे आदिमायेच्या दर्शनासाठी वळतील. आदिमायेचं मूळ स्वरुप झाकून त्यावर आवरणरुपी आदिशक्ती स्थापित करण्याची समयसूचकता तत्कालीन संत-महात्म्यांना कुणी दिली असेल, या प्रश्नाच्या अनुषंगाने देखील शोधकर्ते शोध घेत आहेत. परकीय आक्रमकांपासून मूळ मूर्तीला हानी पोहोचू नये, हा एक त्यातील हेतू असावा.

Saptshringi Devi Mata
सप्तश्रृंगी देवी माता



प्राचीनतेचा शोध...सप्तश्रृंग निवासिनीचं स्थान किती पुरातन आणि प्राचीन आहे. याचे संदर्भ आता संशोधक शोधून समोर आणतं आहेत. देशातील महत्त्वाच्या धार्मिक ग्रंथालयांमध्ये या संदर्भांचा सध्या शोध घेतला जातोय. त्यात जम्मू, काशी, बडोदा, कोलकाता येथील ग्रंथालयांचा समावेश आहे. नाशिकचे सशांतारामशास्त्री भानोसे हे काशीतील ज्येष्ठ अभ्यासकांच्या मदतीने या प्राचीन संदर्भांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे.

Saptshringi Devi Mata
सप्तश्रृंगी देवी माता



इतिहासात दाखले वणी सप्तशृंगी आदिशक्तीचं स्वरुप ( Saptshringi Devi Mata ) आहे. ही देवी नवनाथांची तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची कुलस्वामीनी आहे. मार्कंडेय ऋषींनी सप्तशृंगी गडावर तपश्चर्या केली. पौराणिक संदर्भांमध्ये प्रभू श्रीरामचंद्र सप्तश्रृंगी गडावर येऊन गेल्याचे उल्लेख आढळतात. संत निवृत्तीनाथ महाराजांनी समाधी घेण्यापूर्वी सप्तशृंगी आदिशक्तीची परवानगी घेऊन ते त्र्यंबकेश्वरी समाधीस्त झाले असा इतिहासात उल्लेख आहे. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी देखील संजीवन समाधीपूर्वी या देवीचं दर्शन घेतल्याचे दाखले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील सप्तश्रृंगी मातेचं दर्शन घेतल्याचे दाखले आढळतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.