Income Tax Raid Nashik: नाशिकमध्ये सातहून अधिक बांधकाम व्यवसायिकांवर आयकर विभागाची छापेमारी; 3 हजार 333 कोटींचा बेहिशेबी व्यवहार उघड

author img

By

Published : Apr 26, 2023, 10:45 AM IST

Income Tax Raid Nashik

नाशिक शहरात मागील सहा दिवसापूर्वी आयकर विभागाने सातहुन अधिक बांधकाम व्यवसायिकांवर छापेमारी केली होती. यातील तपास सहा दिवसानंतर पूर्ण झाला आहे. यात तब्बल 3 हजार 333 कोटींचे बेहिशेबी मालमत्तेचे व्यवहार उघडकीस आले आहेत.

नाशिकमध्ये आयकर विभागाचा छापा

नाशिक : नाशिक शहरात सहा दिवसांपूर्वी आयकर विभागाने सातहुन अधिक बांधकाम व्यवसायिकांच्या 40 ते 45 कार्यालय, निवासस्थाने, फार्म हाऊसवर चौकशी सुरू केली होती. राज्यात प्रथमच नाशिक सारख्या शहरात झालेल्या या कारवाईसाठी नाशिकच्या आयकर अन्वेषण विभागासह ठाणे, संभाजीनगर, पुणे, मुंबई, नागपूर कार्यालयातील 200 हून अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक ही कारवाई करत होते. कारवाईसाठी तब्बल 100 हुन अधिक वाहनांचा ताफा वेगवेगळ्या ठिकाणी व्यवसायिकांच्या कार्यालया बाहेर उभा होता.


कर चूकवेगिरी केल्याचा संशय : नाशिक शहरातील मध्यवस्तीत असलेल्या महात्मा गांधी रोडवरील बड्या बांधकाम व्यवसायिकाच्या कार्यालयात 20 एप्रिल रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास अधिकाऱ्यांनी प्रवेश केला. कागदपत्रांची तपासणी केली. या पाठोपाठ कॉलेज रोड, गंगापूर रोड, येवलेकर मळा, कुलकर्णी गार्डन समोरील भागात तसेच गडकरी चौक आणि फेम टॉकीज समोरील बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयाबाहेर वाहनांचा ताफा दाखल झाला. बहुतांश व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणात इमारतीचे बांधकाम सुरू असताना व कागदावर अतिशय कमी उलाढाल दाखवून, करचुकवेगिरी केल्याचा संशय विभागाकडून व्यक्त केला जात आहे.


पाठलाग करून कार पकडली : या छापेमारीत दोघा व्यावसायिकांनी त्यांचा महत्त्वाचा लॅपटॉप, दस्तावेज व इतर बाबी आलिशान दोन कारमधून बाहेर पाठवून दिल्याचे समजले. त्यानुसार पथकाने नाशिक -मुंबई व सिन्नर -पुणे रस्त्यावरील टोल नाक्याची तपासणी केली. यात एक कार चंदनपुरी घाटानजीक पकडली. या कारमध्ये पोतडीत किमान 30 ते 40 खोके भरलेली कागदपत्रे हाती लागली. इगतपुरीतील एका बड्या लॉटरी व्यवसायिकाकडे जवळपास दहा ते पंधरा अधिकारी तळ ठोकून होते. या छाप्यात सुमारे 70 ते 80 कोटीची बेहिशेबी मालमत्ता आढळून आल्याची चर्चा आहे.


3 कोटींची रोकड जप्त : एका बांधकाम व्यवसायिकाची कागदपत्र आणि सर्व रोखीचे व्यवहार, बेकायदेशीर खरेदी-विक्री व कर चुकवण्यासाठीचे दस्तऐवज आनंदवली जवळील एका इमारती ठेवल्याचे पथकाला समजले. त्यानुसार या इमारतीत छापा टाकून किमान दोन, तीन छोटा हत्ती टेम्पो भरून कागदपत्रे जप्त करण्यात आली. तसेच शहरातील विविध राष्ट्रीयकृत बँकांसह खाजगी लॉकरची तपासणी केली. तेव्हा सुमारे तीन कोटींची रोकड व अडीच कोटींचे दागिने मिळाल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा : Income Tax Raid : पहिल्या टप्यातील मतदान आटोपताच आयकर विभागाची 40 ठिकाणांवर छापेमारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.