बंजारा समाजाच्या हितासाठी पक्षभेद विसरून सोबत या - माजी वनमंत्री संजय राठोड

author img

By

Published : Sep 21, 2021, 5:34 AM IST

Former Forest Minister Sanjay Rathod at the Banjara community meet in nandgaon, nashik

नांदगाव येथे बंजारा समाजाचा मेळाव्यात संपन्न झाला. यावेळी माजी वनमंत्री संजय राठोड हे बोलत होते. त्यांनी बंजारा समाजाला मागील सर्व मतभेद आणि पक्षभेद विसरून बंजारा समाजाच्या हितासाठी आणि विकासासाठी एकत्र येणाचे आवाहन केले आहे.

नांदगाव (नाशिक) - मी राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री असताना बंजारा समाजाच्या विविध प्रश्नांवर काम करतोय आणि भविष्यात देखील जोपर्यंत सर्व बंजारा समाजाचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत पाठपुरावा करत राहील. या कामात मला सर्वानी पक्ष भेद सोडून साथ द्यावी असे आवाहन माजी वनमंत्री संजय राठोड यांनी केले आहे. नांदगाव येथील बंजारा समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते.

माजी वनमंत्री संजय राठोड यांची प्रतिक्रिया

'मला साथ द्या'

यावेळी बोलताना राठोड म्हणाले की, मला कोणते पद नकोय, यासाठी मी फिरतनसून आतापर्यंत 12 जिल्ह्यांत मी समाजाचे मेळावे घेतले अजून उर्वरित जिल्ह्यात देखील जाऊन बंजारा समाजाच्या अडीअडचणी जाणून त्या शासनदरबारी मांडून मागण्या मान्य करून घेणार आहे. यासाठी मला साथ द्या असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मंचावर नांदगांव तालुक्याचे आमदार सुहास कांदे व राष्ट्रीय बंजारा समाजाचे कार्यकारणी सदस्य के सी राठोड उपस्थित होते.

'मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे पालन करणारा कार्यकर्ता'

सध्या खूप घाणेरड्या पध्दतीने राजकारण सुरू असून माझ्यावर देखील आरोप करण्यात आले होते. त्यामुळे मी स्वतः राजीनामा दिला. जेव्हा चौकशी पूर्ण होईल तेव्हा पुन्हा पद द्या असे स्पष्ट सांगितले आहे. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करणारा साधा कार्यकर्ता असून जेव्हा त्यांना वाटेल, तेव्हा ते मला कॅबिनेट मंत्री करतील असेही यावेळी ते म्हणाले.

महिलांनी पारंपरिक वेशभूषा केली होती परिधान -

यावेळी बंजारा समाजातील अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी केली व यासाठी आम्ही सर्वजण मुंबई दिल्ली कुठेही येण्यास तयार आहोत असे हात उंचावून सांगितले. या कार्यक्रमास बंजारा समाजातील महिला पारंपरिक वेशभूषा परिधान करून आल्या होत्या.

'हे शक्तीप्रदर्शन नाही'

मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरतो आहे बंजारा समाजाच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी मी प्रत्येक तालुक्यातील तांड्यावर जाऊन चर्चा करतो आहे.मी फक्त आणि फक्त समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतोय मी मंत्रिमंडळात वर्णी लागावी म्हणुन कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा शक्तिप्रदर्शन करत नसून माझ्या नेत्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे, योग्य वेळी ते योग्य निर्णय घेतील त्यामुळे काळजी नसावी, असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा - येवल्यातील शिक्षकाने गावातल्या भिंतीवर रंगवले इंग्रजी शब्द व मराठी अर्थ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.