लॉकडाऊन काळात रोजगार नसल्याने छापल्या बनावट नोटा; सुरगाणा तालुक्यातील धक्कादायक प्रकार

author img

By

Published : Sep 14, 2021, 3:18 PM IST

Updated : Sep 14, 2021, 3:26 PM IST

Counterfeit notes

लॉकडाऊन काळात रोजगार नसल्याने युवकांनी बनावट नोटा छापल्या असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण येथे हा प्रकार समोर आला आहे.

नाशिक - सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण येथे बाजारात भाजीपाला खरेदीच्या नावाने बनावट नोटा चलनात आणल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणात सुरगाणा पोलिसांनी पुन्हा निफाड तालुक्यातील विंचूर येथून चौघांना अटक केली आहे. लॉकडाऊन काळात रोजगार नसल्याने युवकांनी बनावट नोटा छापल्या असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

माहिती देताना पोलीस अधीक्षक सचिन पाटील
  • प्रिंटर, कागद, शाई असा ९ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त -

निफाड तालुक्यातील विंचूरच्या पोतनीस पार्कमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. यात बनावट नोटा छापण्यासाठी लागणारे साहित्य, प्रिंटर, कागद, शाई असा ९ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणात आतापर्यंत विविध ठिकाणी छापे टाकत ७ संशयितांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा - गणेश विसर्जन पवई तलावात मगरीचे दर्शन

विंचूर येथून किरण गिरमे (विंचूर), प्रकाश पिंपळे (ता. येवला), राहुल बडोदे (ता. चांदवड), आनंदा कुंभर्डे (ता. चांदवड) अशी नव्याने अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता, संशयित किरण गिरमे आणि आनंदा कुंभार्डे यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

surgana police
आरोपीला पोलिसांनी केली अटक
  • सुरगाणा पोलिसांची थेट विंचूरला धडक कारवाई -

उंबरठाण येथील बाजारात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करताना आठवडाभरापूर्वी येवला येथील हरीश गुजर व चिचोंडी (ता. येवला) येथील बाबासाहेब भास्कर सैद यांना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय उदयसिंग राजपूत (रा. येवला) याचे नाव समोर आल्याने त्यास अटक करण्यात आली होती. या तिघांचीही पोलीस कोठडी संपल्याने त्यांना सुरगाणा पोलिसांनी दिंडोरी न्यायालयात हजर केले होते. यानंतर न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

सोमवारी (दि. १३) सुरगाणा पोलिसांनी थेट विंचूरला जात धडक कारवाई केली. यावेळी संशयित किरण गिरमे याच्या घरातून संगणक, लॅपटॉप, प्रिंटर, शाई, बनावट नोटा बनविण्यासाठी लागणरा कागद तसेच काही कागदपत्रे जप्त करत, बनावट नोटा छापणा-या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ही कारवाई सुरगाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश बोडके, पोलीस नाईक पराग गोतरणे, संतोष गवळी यांनी केली आहे.

हेही वाचा - धक्कादायक : वर्धा नदीत बोट उलटून ११ जण बुडाले, अमरावती जिल्ह्यातील गाळेगाव येथील घटना

Last Updated :Sep 14, 2021, 3:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.