प्रकाशा येथील दोघे भाऊ तापीत बुडाले; एकाला वाचविण्यात यश, दुसर्‍याचा शोध सुरू

author img

By

Published : Sep 14, 2021, 10:37 AM IST

दोघे भाऊ तापीत बुडाले

हतनूर धरणाचे दरवाजे उघडल्याने प्रकाशा बॅरेजमध्ये पाण्याचा प्रवाह वाढला होता. त्यामुळे प्रकाशा बॅरेजचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे तापी नदीला पुराचे स्वरूप आलेले आहेत. प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नंदुरबार - दोन दिवसांपूर्वी आजोबांचा मृत्यू झाल्यानंतर प्रकाशा येथील तापी नदी मुंडन विधीसाठी गेलेल्या दोन्ही नातूनी मुंडन केल्यानंतर तापी नदीत आंघोळ करीत असताना मोठ्या भावाचा पाय घसरल्याने तो पाण्यात वाहून जाताना लहान भावाने पाहिले व त्याने मोठ्या भावाला वाचविण्‍यासाठी प्रवाहात उडी टाकली. मच्छिमारांनी प्रयत्न करून मोठ्या भावास बाहेर काढले. मात्र लहान अद्याप बेपत्ताच आहे.

प्रकाशा येथील दोघे भाऊ तापीत बुडाले

आंघोळीसाठी गेलेले युवक पाण्यात बुडाले -

शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील रविन सामुद्रे यांचे वडील मयत झाले होते. वडीलांच्या दशक्रिया विधीसाठी काल नातेवाईकांसमवेत रविन सामुद्रे केदारेश्‍वर मंदिराच्या पाठीमागे असलेल्या स्मशानभूमीजवळ तापीनदी किनारी गेले होते. यावेळी रविन सामुद्रे यांचा मोठा मुलगा गौतम सामुद्रे व लहान मुलगा राज सामुद्रे हे दोघेही मुंडन केल्यानंतर आंघोळीसाठी तापीनदी किनारी पाण्यात आंघोळीसाठी उतरले. यावेळी गौतम सामुद्रे याचा अचानक पाय घसरल्याने तो पाण्यात बुडाला. त्याच्या सोबत असलेला लहान भाऊ राज सामुद्रे त्या वाचविण्यासाठी नदीत उडी मारली. परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने राज सामुद्रे वाहुन गेला. यावेळी तापीनदीच्या पात्रात मच्छिमारांनी उडी टाकत गौतम सामुद्रे यास पाण्यातुन बाहेर काढले. उपचारासाठी प्रकाशा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तसेच लहान भाऊ राज सामुद्रे याचा पाण्यात शोधकार्य सुरू आहे. प्रकाशा गावातील पट्टीच्या पोहणार्‍यांच्या मदतीने राजचा शोध घेतला जात आहे. परंतु पाण्याचा प्रवाह जादा असल्याने तो मिळाला नाही.

प्रकाशा बॅरेजचे पाणी सोडल्याने सतर्कतेचा इशारा -

हतनूर धरणाचे दरवाजे उघडल्याने प्रकाशा बॅरेजमध्ये पाण्याचा प्रवाह वाढला होता. त्यामुळे प्रकाशा बॅरेजचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे तापी नदीला पुराचे स्वरूप आलेले आहेत. प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.