नंदुरबारची कोरोना मुक्तीकडे वाटचाल, व्यापाऱ्यांची व्यवसायासाठी निर्बंध शिथील करण्याची मागणी

author img

By

Published : Aug 2, 2021, 7:21 PM IST

Updated : Aug 2, 2021, 7:32 PM IST

Nandurbar moves towards corona free

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर घट दिसून येत आहे. जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 13 वर आली आहे. जिल्हा रुग्णालयात मुबलक प्रमाणात बेड उपलब्ध आहेत. राज्य शासनाने नंदुरबार जिल्ह्यात लॉकडाऊन शिथील करावे, अशी मागणी व्यापारी वर्गाकडून केली जात आहे.

नंदुरबार - नंदुरबार जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर घट दिसून येत आहे. जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 13 वर आली आहे. जिल्हा रुग्णालयात मुबलक प्रमाणात बेड उपलब्ध आहेत. राज्य शासनाने नंदुरबार जिल्ह्यात लॉकडाऊन शिथील करावे, अशी मागणी व्यापारी वर्गाकडून केली जात आहे. गेल्या दोन वर्षात व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तरी वेळेत शिथिलता करावी व शनिवार-रविवारी देखील व्यापार करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी व्यापारी वर्गाकडून जोर धरू लागली आहे.

नंदुरबारची कोरोना मुक्तीकडे वाटचाल

जिल्ह्यात फक्त 13 ॲक्टिव्ह रुग्ण -

नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ३७ हजार ६९९ नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी ३६ हजार ७३६ जण उपचारादरम्यान बरे झाले असून आतापर्यंत ९५० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली असून सद्यस्थितीत फक्त १३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

वेळेत शिथीलता व्हावी, व्यापाऱ्यांची राज्यकर्त्यांकडे मागणी -

जिल्ह्यात कमी रुग्ण संख्या असलेल्या जिल्ह्यामध्ये आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी निर्बंधांमुळे शिथीलता देणार असल्याचे स्पष्ट केले होते. यात नंदुरबार जिल्ह्यातही शिथीलता मिळावी, या आशेने व्यापारी व सामान्य नागरिक राज्य शासनाच्या आदेशाची वाट पाहत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षापासून लहान मोठे किराणा, कपडे, ज्वेलरी, हॉटेल सर्व व्यापाऱ्यांना निर्बंधांमुळे व्यवसाय करताना अडचणीचा सामना करावा लागला आहे.

ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त -

नंदुरबार जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठांमध्ये ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर नागरिक खरेदीसाठी येत असतात. चार वाजेनंतर ग्रामीण भागातील नागरिकांना परतीच्या प्रवासादरम्यान पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जाते. त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन केल्यावर पोलीस प्रशासनाकडून दंडही ठोठावला जातो. ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून अडवणूक केली जाते, त्यामुळे नागरिक बाजारात येण्यास धजावतात, याचाही फटका व्यावसायिकांना बसतो. वेळेत निर्बंध असल्यामुळे दुकानात काम करणाऱ्या मजुरांना रोजगार देणे जिकिरीचे ठरत आहे. नंदुरबार जिल्ह्यात रुग्ण संख्या कमी झाली आहे आता तरी राज्य शासनाने निर्बंधांत शिथीलता द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली.

Last Updated :Aug 2, 2021, 7:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.