नंदुरबार : मृत्यूनंतरही यातना संपेना... युवकाच्या अंत्यविधीसाठी नदीतून जीवघेणा प्रवास

author img

By

Published : Oct 2, 2021, 10:39 PM IST

life-threatening journey across the river for youth funeral nandurbar

नवापुर तालुक्यातील धनराट जवळील कोतवाल फळी या गावातील नागरिकांना मृतदेह स्मशानभूमीपर्यंत घेऊन जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचा रस्ता उपलब्ध नाही. जीवघेण्या नदीतून एका दोरीच्या सहाय्याने तो मृतदेह रंगावली नदीच्या पलीकडे असलेल्या स्मशानभूमी खडकाळ जागेवर अंत्यविधीसाठी स्वतःचा जीव मुठीत घेत स्मशानभूमी गाठावी लागते. अशी गंभीर परिस्थितीत असतानाही देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत या गावात ही नदी पार करत स्मशानभूमी पर्यंत जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचा मार्ग उपलब्ध नाही.

नंदुरबार - मरणानंतरही यातना सुटेना असाच काहीसा प्रकार नवापुर तालुक्यातील धनराट गावाच्या कोतवालफळी पाड्यातुन समोर आला आहे. या गावातील ग्रामस्थांना चक्क प्रेत रंगावली नदीच्या पाण्याच्या प्रवाहातुन दुसऱ्या काठावर घेवुन जाव लागत आहे. नदीला पाणी नसतांना हा अंतिम प्रवास सुकर होतो. मात्र, रंगावली नदीला पाणी असतांना नदीत दोरीच्या सहाय्याने प्रेत नदीपार घेऊन जाऊन अंत्यविधी करावे लागत आहे.

स्थानिक नागरिकाची प्रतिक्रिया आणि नदीतील दृश्ये

कोतवालफळी हे जवळपास तीनशे लोकवस्तीचे गाव असुन गाव नदीच्या ज्या किनाऱ्यावर वसले आहे. तिथे स्मशानभुमीसाठी गावठाणाची जागाच नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासुन गावकऱ्यांना नदीपार स्मशानभुमीत अंतीमसंस्कार करावे लागतात. येथील दानियल सत्तू कोतवाल याचा मृत्यू झाला व त्याच्या अंत्यविधीसाठी ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागली. त्यानंतर हे चित्र समोर आले.

अनेक वर्षांपासून स्मशानभूमीच नाही -

नवापुर तालुक्यातील धनराट जवळील कोतवाल फळी या गावातील नागरिकांना मृतदेह स्मशानभूमीपर्यंत घेऊन जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचा रस्ता उपलब्ध नाही. जीवघेण्या नदीतून एका दोरीच्या सहाय्याने तो मृतदेह रंगावली नदीच्या पलीकडे असलेल्या स्मशानभूमी खडकाळ जागेवर अंत्यविधीसाठी स्वतःचा जीव मुठीत घेत स्मशानभूमी गाठावी लागते. अशी गंभीर परिस्थितीत असतानाही देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत या गावात ही नदी पार करत स्मशानभूमी पर्यंत जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचा मार्ग उपलब्ध नाही.

हेही वाचा - शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून मदत देणे गरजेचे - बच्चू कडू

युवकाच्या मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी हळहळ -

नवापूर तालुक्यातील धनदाट कोतवाल फळी येथील 24 वर्षीय दानियल सत्तू कोतवाल या युवकाचा टायफाईड व मलेरियामुळे मृत्यू झाला. यानंतर त्याच्या अंत्यविधीसाठी मृतदेह गावात असलेल्या रंगावली नदीच्या पलीकडे करावा लागणार होता. यामुळे त्याच्या अंत्यविधी करावा हा प्रश्न स्थानिकांना पडला होता. त्यात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे रंगावली नदीला पूर आल्यामुळे ग्रामस्थ चिंतित झाले होते. अखेर ग्रामस्थांनी एका दोरीच्या सहाय्याने मृतदेह नदीच्या पलीकडे नेऊन अंत्यसंस्कार केले.

ग्रामस्थ आपला जीव मुठीत घेऊन मृतदेह एका चार पाईच्या सहाय्याने दोरीचा आधार घेत जीवघेण्या नदीतून प्रवास करत आहेत. स्वतःचा जीव मुठीत घेऊन गेलेल्या जीवाला अग्निडाग देण्यासाठी हा जीवघेणा मार्गक्रमण करावा लागत आहे. लवकरच या ग्रामस्थांसाठी या नदीच्या पार करण्यासाठी रस्ता बनवण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.