तापी नदीवरील पुलाचा भराव वाहून गेला; नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

author img

By

Published : Sep 30, 2021, 12:58 AM IST

पुलाचा भराव वाहून गेला

तापी नदीवरील सारंगखेडा ते टाकरखेडा दरम्यानच्या पुलाची अनेक वर्षापासून बिकट अवस्था झाली आहे. मंगळवारी रात्री या भागात अतिवृष्टी झाल्याने टाकरखेडा कडील पुलावरील सपोर्ट पिचिंग भराव वाहून गेला आहे. या भरावाचे पाच वर्षात दोन वेळा काम केले होते. यात लाखो रूपये खर्च करण्यात आला आहे. शासनाचे लाखो रूपये पाण्यात गेले असून हा पुल शेवटच्या घटका मोजत असल्याचे यातून चित्र निर्माण झाले आहे.

नंदुरबार - जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात मुसळधार पाऊस झाल्यामुळे व सारंगखेडा बॅरीजमध्ये हतनुर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सारंगखेडा व प्रकाशा बॅरेज ओवरफ्लो झाले आहेत. सारंगखेडा येथील तापी नदीवरील सारंगखेडा ते टाकरखेडा या दरम्यानच्या पुलाची अगोदरच अवस्था अधिकच बिकट झाली आहे. टाकरखेडा भागातील सपोर्ट पिचिंग भरावच वाहून गेला असल्यामुळे काही प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने एका बाजूने वाहतूक बंद करण्यात आली आहे. जिल्हा अधिकारी मनिषा खत्री यांनी पाहणी करून आढावा घेतला.

तापी नदीवरील पुलाचा भराव वाहून गेला

तापी नदीवरील पुलाची दुरावस्था

तापी नदीवरील सारंगखेडा ते टाकरखेडा दरम्यानच्या पुलाची अनेक वर्षापासून बिकट अवस्था झाली आहे. मंगळवारी रात्री या भागात अतिवृष्टी झाल्याने टाकरखेडा कडील पुलावरील सपोर्ट पिचिंग भराव वाहून गेला आहे. या भरावाचे पाच वर्षात दोन वेळा काम केले होते. यात लाखो रूपये खर्च करण्यात आला आहे. शासनाचे लाखो रूपये पाण्यात गेले असून हा पुल शेवटच्या घटका मोजत असल्याचे यातून चित्र निर्माण झाले आहे. पुलाच्या टाकरखेडा कडील भराव वाहून गेल्याचे सकाळी लक्षात आल्यावर भराव खचल्याचा फोटो दिवसभर सोशल मिडीयावर व्हायरल झाला. त्यावरून मनसेचे रस्ते आस्थापनाचे उपाध्यक्ष राकेश पेडणेकर यांनी जिल्हाधिकारी, बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग नाशिक, तहसीलदार यांना माहीती दिली. या विभागांनी सारंगखेडा पुलावर येऊन पाहणी केली.

नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

उत्तर-मध्य महाराष्ट्रात 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने आज हतनूर आणि वाघूर धरणातुन 1 लाख 49 हजार 110 क्युसेक व सुलवाडे बॅरेजचे 12 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात येवून 2 लाख 32 हजार 701 क्युसेक इतका विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सारंगखेडा प्रकल्पाचे 12 दरवाजे पूर्णपणे उघडून 2 लाख 21 हजार 664 क्युसेक्स व प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे 17 दरवाजे पूर्णपणे उघडून 2 लाख 36 हजार 093 क्युसेक्स इतका विसर्ग तापी नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आलेला आहे. पुढील 48 ते 72 तासात सदर प्रकल्पाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आवश्यकतेनुसार विसर्ग वाढविण्यात येईल.
तापी काठावरच्या गावातील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.