कोरोना निर्बंध असल्याने गणेश मूर्तीकारांमध्ये नाराजी, मात्र इतर राज्यातून मूर्तींना मागणी असल्याने काहीसे समाधान व्यक्त

author img

By

Published : Sep 5, 2021, 7:44 PM IST

Updated : Sep 5, 2021, 8:23 PM IST

गणेश मुर्ती

नंदुरबार जिल्ह्या गणेशाच्या मोठ्या मूर्तींसाठी प्रसिद्ध असल्यामुळे गुजरात मध्यप्रदेशसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमधून मूर्ती खरेदीसाठी नंदुरबार जिल्ह्यात गणेश प्रेमी दाखल होत असतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोणाच्या महामारीमुळे गणपती मूर्ती यांच्या उंचीच्या निर्बंध आवरून कारखानदारांना मोठ्या प्रमाणावर नुकसानीचा सामना करावा लागला आहे. मात्र, यंदा मध्यप्रदेश राज्यातून मोठ्या मूर्तींची मागणी झाल्यामुळे कारखानदारांनी काही प्रमाणात समाधान व्यक्त केले आहे.

नंदुरबार - नंदुरबार जिल्ह्यात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या मूर्तींसाठी प्रसिद्ध असल्यामुळे गुजरात मध्यप्रदेशसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमधून गणपती मूर्ती खरेदीसाठी नंदुरबार जिल्ह्यात गणेश प्रेमी दाखल होत असतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोणाच्या महामारीमुळे गणपती मूर्ती यांच्या उंचीच्या निर्बंध आवरून गणपती कारखानदारांना मोठ्या प्रमाणावर नुकसानीचा सामना करावा लागला आहे. मात्र, यंदा मध्यप्रदेश राज्यातून मोठ्या मूर्तींची मागणी झाल्यामुळे कारखानदारांनी काही प्रमाणात समाधान व्यक्त केले आहे.

कोरोना निर्बंध असल्याने गणेश मूर्तीकारांमध्ये नाराजी

'नंदुरबारातील मोठ्या मूर्त्यांना मागणी'

पेणनंतर मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये नंदुरबारच्या गणेश मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र, गेल्या दोन वर्षापासून कोरोना निर्बंधामुळे गणेशमूर्तींच्या विक्रीवर अनेक मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे नंदुरबारच्या गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारखान्यांमध्ये अनेक मोठ्या मुर्त्या तयार होऊन पडून होत्या. मात्र, मध्यप्रदेश आणि गुजरात सरकारने गणेश मूर्ती वरील निर्बंध उठवल्याने मोठ्या मूर्तींच्या यांच्या मागणीत वाढ झाली आहे.

'मध्यप्रदेश राज्यातून मोठ्या मुर्त्यांची यंदा मागणी'

नंदुरबार शहरात गणेश मुर्ती बनवणारे लहान-मोठे शंभरपेक्षा अधिक कारखाने आहेत. या कारखान्यात दरवर्षी लाखो गणेश मूर्ती तयार केल्या जातात गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात आकर्षक कलाकुसर असलेल्या नंदुरबारच्या गणेश मूर्ती यांना विशेष मागणी असते. मात्र, दोन वर्षांपासून कोरोनाचा फटका गणेश मूर्ती बनवणारे कारखान्यांना बसला. चार फुटापेक्षा अधिक उंचीच्या गणेश मूर्ती तशाच कारखान्यात पडून होत्या. मात्र, यावर्षी मध्यप्रदेश सरकारने गणेश मूर्तीच्या उंचीवरील काही अंशी शिथिल केल्याने मोठ्या गणेश मूर्तींच्या मागणीत वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे गुजरात राज्यातील गणेश भक्त मोठ्या गणेश मूर्ती घेण्यासाठी येत असल्याने, बाजारपेठेत उत्साह निर्माण झाला आहे. मात्र, आता गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारखान्यांमध्ये श्रींच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवला जात आहे.

'गुजरात व मध्य प्रदेशातील गणेश प्रेमी नंदुरबारात दाखल'

गुजरात व मध्य प्रदेश राज्यातील गणेश प्रेमी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर नंदुरबारात मूर्ती घेण्यासाठी दाखल होत असतात. मात्र, गेल्या वर्षी कारखानदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. परंतु, यंदा गुजरातसह मध्य प्रदेश राज्यातून गणेश प्रेमी मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहेत. त्यामुळे यंदा मूर्ती विक्रेते काही प्रमाणात समाधान व्यक्त करीत आहेत.

हेही वाचा - गणेश मूर्तीशाळेत मूर्तींवर फिरवला जातोय शेवटचा हात, लाॅकडाऊनची झळ बसल्याने मूर्तीकार चिंतेत

Last Updated :Sep 5, 2021, 8:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.