डाकीण ठरवून छळ झालेल्या महिलेचा 'अंनिस'ने लावला शोध, उघडकीस आली 'ही' माहिती

author img

By

Published : Apr 19, 2022, 7:20 AM IST

Updated : Apr 19, 2022, 7:38 AM IST

bygor women tortured as witch

डाकीण ठरवून निर्वस्त्र अवस्थेत छळ झालेल्या महिलेचा ( Women tortured witch suspicion bygor ) व्हायरल झालेल्या व्हिडिओचे सत्य महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन ( Andhashraddha nirmulan samiti in Bygor Satpuda ) समितीने उघडकीस आणले आहे. सदर महिला महाराष्ट्र, मध्यप्रदेश सीमेलगत पानसेमल तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या बायगोर गावातली आहे.

नंदुरबार - डाकीण ठरवून निर्वस्त्र अवस्थेत छळ झालेल्या महिलेचा ( Women tortured witch suspicion bygor ) व्हायरल झालेल्या व्हिडिओचे सत्य महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन ( Andhashraddha nirmulan samiti in Bygor Satpuda ) समितीने उघडकीस आणले आहे. सदर महिला महाराष्ट्र, मध्यप्रदेश सीमेलगत पानसेमल तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या बायगोर गावातली आहे. गावातील काही लोकांनी तिला डाकीण ठरवून अंगावर चटके देण्याची शिक्षा दिली होती. याबाबतचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. महिला तीस वर्षांची विवाहित तरुणी असून, गेली बारा वर्षे मनोरुग्ण अवस्थेत गावातच हिंडत आहे. नग्नावस्थेत चटक्यांची शिक्षा देऊनही प्रकरण गावातच जातपंचायतीने मिटवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले आहे.

माहिती देताना अंनिसच्या सुमित्रा वसावे

हेही वाचा - ऊसाच्या शेताला लागलेली आग विझवताना शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पथकाने गावाचा शोध लावून प्रत्यक्ष महिलेची भेट घेतली. महिला आणि तिचे कुटुंब अत्यंत दरिद्री अवस्थेत जगत असून, म्हातारे आई - वडील व लहान भाऊ असा छोटा परिवार आहे. मजुरी करून जीवन जगणार्‍या या कुटुंबात महिला बारा वर्षांपासून मनोरुग्ण या अवस्थेत आहे. अंधश्रद्धांच्यापायी कुटुंबाने महिलेला अनेक बुवा-बाबा मांत्रिक यांच्याकडे फिरवत उपचार करण्याचा प्रयत्न केला. काही हजार रुपये खर्च करूनही उपचार न झाल्याने महिला आजही मनोरुग्ण अवस्थेत आहे.

अनिसने स्वीकारली महिलेची जबाबदारी - महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष कुटुंबाला भेट देऊन त्यांना आधार दिला आणि मानसिक उपचारासाठी मदतीची जबाबदारी स्वीकारली. याबाबतची तक्रार मध्यप्रदेश प्रशासनापर्यंत पोहचवून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याबाबत संघटना प्रयत्न करणार आहे. तेथील प्रशासनाच्या सहकार्याने डाकीण प्रथा विरोधी प्रबोधनाचे मोहीम सुरू करण्याबाबत प्रस्ताव देणार आहे. या पथकामध्ये महाराष्ट्र आणि अक्कलकुवा शाखा कार्याध्यक्ष सुमित्रा वसावे, शहादा कार्यकर्ते के.आर. पाडवी, अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील आणि राज्य सरचिटणीस विनायक सावळे आणि आडगावचे पोलीस पाटील गौतम खर्डे उपस्थित होते.

हेही वाचा - NCP April Fool Agitation Nandurbar : नंदुरबारमध्ये राष्ट्रवादीचे 'एप्रिल फुल' आंदोलन; केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

Last Updated :Apr 19, 2022, 7:38 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.