व्यायाम करत असताना आश्रम शाळेतील 16 वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू, नवापूर तालुक्यातील घटना

author img

By

Published : Oct 1, 2021, 4:32 PM IST

Updated : Oct 1, 2021, 4:50 PM IST

student dies while exercising

नवापूर तालुक्यातील धनराट शासकीय आश्रमशाळेत दहावीत शिकणाऱ्या एका मुलाचा शाळेच्या आवारातच मृत्यू झाला आहे. सकाळी रनिंग करत असताना तो अचानक जमिनीवर कोसळला. त्याला नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

नंदुरबार - नवापूर तालुक्यातील धनराट शासकीय आश्रमशाळेतील दहावीत शिकणाऱ्या एका मुलाचा शाळेच्या आवारातच मृत्यू झाला आहे. भाऊ कारज्या गावीत असे मुलाचे नाव असून तो 16 वर्षांचा होता. सकाळी शाळेच्या आवारात तो रनिंग करत असताना चक्कर येऊन पडला. त्याला आश्रमशाळेतील कामाठ्याने उपचारासाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याल मृत घोषित केले. सदरचा विद्यार्थी हा नवापूर तालुक्यातील भोवरे या गावातील मूळ रहिवाशी होता. मुलावर नवापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी त्याच्या पालकांनी रुग्णालय आवारात आक्रोश केला.

शाळेच्या आवारातच विद्यार्थ्यांचा मृत्यू -

आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालय नंदुरबार अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळेतील एका 16 वर्षीय विद्यार्थ्यांचा सकाळी सहा वाजेच्या सुमारास पटांगणात रनिंग करताना मृत्यू झाला.

व्यायाम करताना 16 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू
रुग्णालय परिसरात नातेवाईकांची गर्दी -
घटनेची माहिती समजताच नातेवाईकांनी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात व धनराट शासकीय आश्रम शाळेत मोठी गर्दी केली. त्याच्या आई-वडिलांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. मृत विद्यार्थी भाऊ करज्या गावित (वय 16, इयत्ता दहावी) हा भवरे, तालुका नवापूर येथील रहिवाशी आहे. करज्या मोना गावीत यांना 6 मुले आहेत भाऊ गावित हा 4 नंबर चा मुलगा होता. 5 नंबरचा मुलगा देखील धनराट शासकीय आश्रम शाळेत शिकत आहे.


हे ही वाचा -मला व माझ्या कुटुंबाला बदनाम करण्याचे भाजपचे कारस्थान - हसन मुश्रीफ

मुलाचा अचानक मृत्यू झाल्याने गावित परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संबंधित विद्यार्थ्याला आदिवासी विकास विभागाच्या नियमानुसार तात्काळ मदत मिळावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. नवापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर त्यांच्या गावी विद्यार्थ्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Last Updated :Oct 1, 2021, 4:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.