Dussehra Melawa : राज्यात असे प्रकार घडणे दुर्दैवी; बाळासाहेब थोरात यांची शिंदे यांच्यावर टीका

author img

By

Published : Oct 2, 2022, 3:36 PM IST

balasaheb thorat

दसरा मेळाव्यावरून शिवसेना, शिंदे गटात स्पर्धा सुरू आहे. यावर राज्यात जे काही चालल ते योग्य नाही अशी, प्रतिक्रिया माजी मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb thorat ) यांनी दिली. ते नांदेडमध्ये बोलत होते. राज्यात कधीही असा इतिहास घडला नाही. पण आता घडत आहे हे दुर्दैव असल्याचे थोरात म्हणाले.

नांदेड - दसरा मेळाव्यावरून शिवसेना, शिंदे गटात स्पर्धा सुरू आहे. मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी पैसे दिले जात असल्याचा आरोप खासदार खैरे यांनी केला. दरम्यान राज्यात जे काही चालल ते योग्य नाही अशी, प्रतिक्रिया माजी मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb thorat ) यांनी दिली. ते नांदेडमध्ये बोलत होते. राज्यात कधीही असा इतिहास घडला नाही. पण आता घडत आहे हे दुर्दैव असल्याचे थोरात म्हणाले. दसरा मेळाव्यासाठीची स्पर्धा योग्य नसल्याने थोरात म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांचे काँग्रेस सोबत संधान असल्याचा अग्रलेख सामनामध्ये लिहिण्यात आला. त्यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली. याबाबत खूप चर्चा झाली. स्वता सामनातून खरं घडलेला इतिहास स्पष्ट झाल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले.

बाळासाहेब थोरात

पीएफआयवर कारवाई योग्य - कोणी देशविघातक कृत करत असेल तर, कारवाई केली पाहिजे असं म्हणत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पीएफआय वरील बंदीचे समर्थन केले. जात, धर्म, पंत न पाहता कारवाई झाली पाहिजे, पण कोणावर विनाकारण अन्याय होऊ नये असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

पाच नोव्हेंबरला भारत जोडे यात्रा नांदेडमध्ये - काँग्रेस नेते राहुल गांधी ( Congress leader Rahul Gandhi ) यांची भारत जोडो यात्रा ( India Jodo Yatra ) येत्या नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्र राज्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) यांनी दिली. राज्यात नांदेडहून या यात्रेला सुरुवात होणार आहे. पाच नोव्हेंबर रोजी नांदेडच्या देगलूर येथे यात्रा येणार आहे. त्यासाठी तयारी सुरू असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. राज्यात यात्रेचा 18 रात्रीचा मुक्काम असेल. राज्यात भारत जोडे यात्रेचा 360 किलोमीटर प्रवास असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले ..


शिंदे बाबत बोलण्यास चव्हाणांचा नकार - एकनाथ शिंदे काँग्रेस सोबत सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव घेऊन आले होते असा दावा काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला होता. मात्र याबाबत कॅमेऱ्या समोर बोलण्यास त्यांनी नकार दिला. मी ऑन रेकॉर्ड यावर काही बोलनार नाही. वास्तव काय आहे ते शिंदेना विचारा असे चव्हाण म्हणाले.

भाजपा प्रवेशाची अफवा- अशोक चव्हाण भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. पण आपण कुठेही तसं वक्तव्य केल नसल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. काही जण अफवा पसरवत आहेत. त्यांना मी का उत्तर देऊ असं चव्हाण म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.