Son Killed Father Nanded : जेवणाच्या ताटावरून बाप लेकात वाद, मुलाने सपासप वार करून वडिलांना संपविले

author img

By

Published : Sep 30, 2022, 9:15 PM IST

Son Killed Father Nanded

घरामध्ये मुलगा आणि वडील यांनी जेवण केल्यानंतर समोरील जेवणाचे ताट का उचलत नाहीस ? असे अधिकार वाणीने मयत सासरा लालु पिराजी इंगळे यांनी सुनेला विचारले. हा वाद वाढत गेल्यानंतर मुलगा प्रकाश लालु इंगळे वय ३० वर्षे यास राग आला. हा राग विकोपाला जाऊन जन्मदात्या मुलानेच वडील लालू पिराजी इंगळे वय ६० वर्ष यांच्यावर राहत्या घरातच कुर्हाडीने वार करून खून केला Son killed his father in Nanded आहे. Father killing Nanded, Nanded Crime

नांदेड : घरामध्ये मुलगा आणि वडील यांनी जेवण केल्यानंतर समोरील जेवणाचे ताट का उचलत नाहीस ? असे अधिकार वाणीने मयत सासरा लालु पिराजी इंगळे हा सुनेला विचारला. यात हा वाद वाढत गेल्यानंतर मुलगा प्रकाश लालु इंगळे वय ३० वर्षे यास राग आला. हा राग विकोपाला जाऊन जन्मदात्या मुलानेच वडील लालू पिराजी इंगळे वय ६० वर्ष यांच्यावर राहत्या घरातच कुर्हाडीने वार करून खून केला Son killed his father in Nanded आहे. ही घटना दि. २९ रोजी रात्री नऊ ते दहा वाजताच्या सुमारास तालुक्यातील कासराळी येथे घडली आहे. Father killing Nanded, Nanded Crime

आरोपी मुलगा पोलिसांच्या ताब्यात- आरोपी प्रकाश इंगळे हा वडिलाचा खून केल्या नंतर पळून जात असताना बिलोली पोलिसांनी पाठलाग करून कासराळी बेळकोणी रोडवर ताब्यात घेतले. या बाबत पोलीस स्टेशनमध्ये मयताची पत्नी पार्वतीबाई लालु इंगळे वय ५५ वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमाअन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी प्रकाश इंगळे हा काही दिवस तेलंगना प्रदेशातील नंदिपेठ येथे शेती कामासाठी गेला होता. परत दोन ते तीन महिण्यापूर्वी आपल्या कासराळी या गावी येऊन परिवारासह राहत होता.


वाद सोडवायला गेलल्यांना चाकूचा धाक दाखविला - घरामध्ये या ना त्या कारणाने नेहमी भांडणे व्हायची अशात दि. २९ रोजी रात्री मुलगा प्रकाश दारूच्या तर्रर्र नशेत घरी आला. त्याने आई वडिलांसोबत जेवणही केले. जेवणानंतर वाद सुरू झाला. यातच या नराधमाने हे कृत्य केले. विशेष म्हणजे, ज्यावेळी हा वाद पेटला त्यावेळी काही जणांनी आरोपीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केले असता त्यांनाही चाकूचा वार करण्याची भीती दाखवल्याचे समजले. मयताच्या पश्चात पत्नी, तीन मुली, सुन, नातवंड असा परिवार आहे. यावेळी माजी आमदार सुभाष साबणे, जि.प.चे माजी सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड यांनी या कुटुंबीयांची भेट घेऊन धीर दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.