Attack on Health Officials in Nanded : बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यास गेलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांवर हल्ला; वाहनावर दगडफेक

author img

By

Published : Sep 30, 2022, 1:09 PM IST

Attack on Health Officials in Nanded

नांदेडमधील भोकर तालुक्यात एक विचित्र प्रकार घडल्याचे समोर आले आहे. एका बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यास गेलेल्या ( Health Officials Action Against Bogus Doctor ) आरोग्य अधिकाऱ्यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आल्याचा ( Mob Pelted Stones on Vehicle of Health Officials ) धक्कादायक प्रकार भोकर तालुक्यात घडला आहे. इतकेच नव्हे तर जमावाने डॉक्टरची सुटका करून घेत, जप्त करण्यात आलेली औषधेही पळविल्याची घटना सावरगाव मेट या गावात घडली आहे.

नांदेड : बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यास गेलेल्या ( Health Officials Action Against Bogus Doctor ) आरोग्य अधिकाऱ्यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आल्याचा ( Mob Pelted Stones on Vehicle of Health Officials ) धक्कादायक प्रकार भोकर तालुक्यात घडला आहे. इतकेच नव्हे तर जमावाने डॉक्टरची सुटका करून घेत, जप्त करण्यात आलेली औषधेही पळविल्याची घटना सावरगाव मेट या गावात घडली आहे.

बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यास गेलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांवर हल्ला

गुप्त माहितीद्वारे व तक्रारीवरून आरोग्य अधिकाऱ्यांची कारवाई : गोपनीय माहिती व काहींच्या तक्रारी प्राप्त झाल्यावरून भोकर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राहुल वाघमारे हे ( Bhokar Taluka Health Officer Dr Rahul Waghmare ) सावरगाव मेट ता. भोकर येथील एका बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यासाठी बुधवार दि. २८ सप्टेंबर रोजी गेले असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. ( Shocking Incident has taken Place in Bhokar Taluka )

बोगस डॉक्टरच्या समर्थनार्थ काही गावकऱ्यांनी वाहन अडवून केली दगडफेक : कोणतीही पदवी नसलेला एक बोगस डॉक्टर रुग्णावर उपचार करीत असल्याचे निदर्शनास आल्यावरून त्याच्याजवळील औषधे व उपचार साहित्य जप्त करून कारवाईस्तव त्यास भोकर येथे घेऊन जात असताना त्या बोगस डॉक्टरच्या समर्थनार्थ काही गावकऱ्यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्याचे वाहन अडविले व दगडफेक केली. तसेच, जप्त करण्यात आलेली औषधे आणि साहित्यही पळविल्याचा प्रकार भोकर तालुक्यातील सावरगाव मेट येथे घडला आहे.

हिमांशू मिश्रा विश्वास नावाचा बोगस डाॅक्टर करतो रुग्णांवर उपचार : या गंभीर प्रकाराबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राहुल वाघमारे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, तहसीलदार व पोलीस ठाणे भोकर येथे रितसर माहिती दिली आहे. तालुक्यातील सावरगाव मेट येथे एक बोगस डॉक्टर रुग्णावर उपचार करीत असल्याची माहिती मिळाल्यावरून दि. २८ सप्टेंबर २०२२ रोजी तालुकास्तरीय यंत्रणा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राहुल वाघमारे हे तेथे गेले. तिथे बनियन टॉवेल परिधान केलेला हिमांशू मिश्रा विश्वास नावाचा एक व्यक्ती हा दोन रुग्णांवर उपचार करीत असताना आढळला.

मागील ८ वर्षांपासून लोकांवर ऑलोपॅथीचा उपचार करताहेत : त्यापैकी एका व्यक्तीला आय. व्ही. (सलाईन) लावण्यात आलेली आढळली. यावेळी हिमांशु मिश्रा विश्वास यांची चौकशी केली असता त्याने लेखी जबाब दिला की, मी या गावात मागील ८ वर्षांपासून लोकांवर ऑलोपॅथीचा उपचार करतो. तसेच, त्याच्याजवळ ऑलोपॅथी औषधेसुद्धा आढळून आल्या. त्यांची लाईनलिस्टींग करून मेडीसीन जप्त करून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राहुल वाघमारे व यंत्रणा परत निघाले असता गावातील एका जमावाने त्यांचे चारचाकी वाहन अडविले व त्या वाहनावर दगडफेक केली.

बोगस डॉक्टरविरुद्ध कारवाईसाठी गेलेल्या पथकास जीव मुठीत पळावे लागले : दगडफेक केल्यामुळे डॉ. राहुल वाघमारे यांनी ते वाहन थांबविले असता जमावाने त्यांना अश्लील शिविगाळ केली व वाहनातील जप्त केलेली औषधी जबरदस्ती हिसकावून घेत पळविली. तसेच, त्या बोगस डॉक्टरच्या सुटकेसाठी वाहनाखाली आम्ही जीव देऊ, अशी धमकी दिली. त्या बोगस डॉक्टरलाही त्या वाहनातून पळविले. दगडफेक, शिवीगाळ व मोठमोठ्याने धमक्या हा जमाव देत होता. त्यामुळे बोगस डॉक्टरविरुद्ध कारवाई करण्यासाठी गेलेल्या या पथकास जीव मुठीत धरून रिकामे परतावे लागले. या पथकासोबत एक पोलीस जमादारसुद्धा होते. परंतु, मोठ्या जमावापुढे तेही हतबल झाले होते.

नांदेड जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट : नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. या मंडळींवर कारवाई करण्यास गेलेल्या आरोग्य पथकावर परवा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याचा आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावत निषेध करीत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, भोकर शहरासह ग्रामीण भागात अजूनही मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टर आपले दुकान चालवत आहेत.

या गंभीर प्रकाराबाबत माहिती तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी कडक कारवाई करावी : या सगळ्या मंडळींवर कडक कारवाई करण्यासाठी तहसीलदार राजेश लांडगे यांनी आता पथकांची निर्मिती केली आहे. भोकर तालुक्यातील सगळ्याच बोगस डॉक्टरवर भरारी पथकाच्या माध्यमातून कारवाई करणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितलंय. या गंभीर प्रकाराबाबत वरीलप्रमाणे माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राहुल वाघमारे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.नांदेड, तहसीलदार, तहसीलदार कार्यालय, भोकर, गट विकास अधिकारी, पंचायत समिती भोकर, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे भोकर यांच्याकडे दिली आहे.

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.