नांदेडमध्ये बड्या नेत्याच्या निकटवर्तीयांच्या घर व कार्यालयावर आयकर खात्याच्या धाडी

author img

By

Published : Sep 25, 2021, 9:53 PM IST

Vijay Yevankar house raid Nanded

येथे एका बड्या नेत्याचे निकटवर्तीय असणाऱ्या दिनेश बाहेती व विजय येवनकर यांच्या घर व कार्यालयावर आयकर खात्याकडून शनिवारी दुपारपासून धाड टाकत सर्च ऑपरेशन करण्यात आले.

नांदेड - येथे एका बड्या नेत्याचे निकटवर्तीय असणाऱ्या दिनेश बाहेती व विजय येवनकर यांच्या घर व कार्यालयावर आयकर खात्याकडून शनिवारी दुपारपासून धाड टाकत सर्च ऑपरेशन करण्यात आले.

हेही वाचा - UPSC : नांदेडच्या पोलीस पुत्र 'रजत'ला दुसऱ्या प्रयत्नात 'सुवर्ण' यश, ६०२ रँकिग

नांदेड शहरातील आयटीआय परिसरातील व आनंद नगर येथील बड्या नेत्याच्या निकटवर्तीयांच्या घर व कार्यालयाची आयकर खात्याकडून झडाझडती घेण्यात येत आहे. विजय येवनकर व दिनेश बाहेती हे एका सिमेंट एजन्सीचे व्यावसायिक भागिदार असून विजय येवनकर हे नांदेड महापालिकेच्या विद्यमान महापौर यांचे पती आहेत. सदर सर्च ऑपरेशन नांदेड शहरातील आयटीआय परिसरातील विष्णू कॉम्प्लेक्स व आनंद नगर येथील राजमॉल स्थित ऑफिससवर चालू आहे. यात सदर विभागाच्या दोन टीम अंतर्गत हे सर्च ऑपरेशन सुरू आहे. ज्यात संबंधित कार्यालयाच्या बाहेर मुंबई पासिंग असणाऱ्या गाड्या व पोलिसांची वर्दळ पहावयास मिळत आहे. त्यामुळे, संपूर्ण शहरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

चौकशी राजकीय वाटते - अशोक चव्हाण

नांदेडच्या आयकर खात्याकडून होत असलेल्या चौकशीचे प्रकरण मला राजकीय वाटत आहे. हे सगळे राजकीय दृष्टिकोनातून देशभरात चाललेल्या प्रकरणाचा भाग आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

हेही वाचा - UPSC : पहिल्याच प्रयत्नात नांदेडच्या सुमितकुमारची घोडदौड, 660 वी रँक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.