Ashok Chavan : अशोक चव्हाणांच्या 'या' धक्कादायक विधानामुळे मुख्यमंत्री शिंदेंची कोंडी? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

author img

By

Published : Sep 29, 2022, 7:54 AM IST

Congress Leader Ashok Chavan Statement

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापने संदर्भातील एक गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यामुळे मुख्यमंत्री अडचणीत येण्याची शक्यता ( Ashok Chavan Created a Stir in Political Circles ) आहे. त्यांनी यांसंदर्भात सांगितले की, आपण, म्हणजे शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करू, अशा आशयाचा प्रस्ताव घेऊन शिवसेनेचे नेते माझ्याकडे ( Excitement in Political Circles ) आले होते. त्यामध्ये सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश ( Excitement in Political Circle Due to Chavan Statement ) होता. या गौप्यस्फोटाने मुख्यमंत्री अडचणीत येण्याची शक्यता आहे.

नांदेड : महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेची कोंडी होत ( Ashok Chavan Created a Stir in Political Circles ) आहे. शिवसेनेला निधी मिळत नाही, असा आरोप करीत शिंदे गटाने बंड केले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार ( Mahavikas Aghadi Government Collapsed ) कोसळले. मात्र, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी होण्याची शक्याता ( Ashok Chavan Statement Possibile of Dilemma For CM ) आहे.

माझ्याकडे आले होते शिवसेनेचे शिष्टमंडळ : अशोक चव्हाण म्हणाले, भाजप, शिवसेना युती सरकारच्या काळात युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून आला होता. शिंदे यांचाही त्या शिष्टमंडळात समावेश होता, असा गौप्यस्फोटच अशोक चव्हाण केला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूक भाजप-शिवसेनेने एकत्र लढवली होती. मात्र, त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले. या घटनेने राजकीय जाणकारांना आश्चर्याचा धक्का बसला.

भाजपसोबत आता राहायचे नाही अशी शिवसेनेची भूमिका : भाजपसोबत आता राहायचे नाही ही शिवसेनेची भूमिका त्यापूर्वीच म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारच्या काळातच झाली होती. तेव्हा शिवसेनेचे मंत्री आमचा राजीनामा खिशात आहे, असे जाहीर भाषणांमध्येही सांगत होते. युतीसरकामध्ये आपल्याला सन्मान मिळत नाही, अशी तक्रारही शिवसेनेने केली होती. आपण, काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करू, अशा आशयाचा प्रस्ताव घेऊन शिवसेनेचे नेते आले होते. त्यामध्ये सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचाही समावेश होता. या सर्वांनी माझ्या मुंबईतील कार्यालयात भेट घेतली होती, असेही चव्हाण यांनी सांगितले आहे, असे विश्वासनीय सूत्रांनी सांगितले आहे.

शरद पवार यांच्याशी चर्चा करण्याचा दिला सल्ला : अशा प्रकारचे सरकार स्थापन करायचे असल्यास तुम्ही आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करा, असे मी या नेत्यांना सांगितले होते, असेही चव्हाण यांनी सांगितले. मात्र, नंतर ते पवार साहेबांना भेटले किंवा नाही याबाबत मला काहीही माहिती नाही, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अशोक चव्हाण यांच्या या खुलाशामुळे राजकीय वर्तुळात खळबळ : अशोक चव्हाण यांच्या या खुलाशामुळे विद्यमान मुख्यमंत्री शिंदे यांना भाजपविषयी काय वाटते, हा प्रश्न उपस्थित होणार आहे. प्रसार माध्यमांसमोर बोलण्यास अशोक चव्हाण यांनी नकार दिला. मी जे काही बोललो आहे, ते ऑफ द रेकॉर्ड आहे, मी काहीही ऑन रेकॉर्ड बोलणार नाही, असे म्हणत अशोक चव्हाण यांनी मुलाखत देणास नकार दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.