Eknath Khadse : एकनाथ खडसेंच्या विरोधात गुन्हा दाखल

Eknath Khadse : एकनाथ खडसेंच्या विरोधात गुन्हा दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार एकनाथ खडसे ( MLA Eknath Khadse ) यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा ( case registered against Eknath Khadse ) दाखल करण्यात आला आहे. बंजारा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य ( Eknath Khadse offensive statement ) केल्याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा ( airport police station ) दाखल झाला आहे.
नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार एकनाथ खडसे ( MLA Eknath Khadse ) यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा ( ( case registered against Eknath Khadse ) ) नोंदवण्यात आला आहे. बंजारा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ( Eknath Khadse offensive statement ) हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीच्या काळात बंजारा समाजाला २ किलो मटण, १ किलो बोटी, दारू दिले की दुसरे काही लागत नाही वक्तव्य खडसेंनी केले होते. जळगाव येथील एका मेळाव्यात खडसे बोलले होते.
नांदेडच्या विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा - एकनाथ खडसे यांनी बंजारा समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर खडसे यांच्याविरोधात बाजरा समाज आक्रमक झाला आहे. खडसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी बंजारा समाजाने केली होती. दरम्यान, बंजारा समाजाबद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या विरुद्ध नांदेडमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड शहरातील विमानतळ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खडसे यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन - एकनाथ खडसे यांनी बंजारा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. खडसे यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात बंजारा समाज आक्रमक झाला आहे. नांदेडमध्ये देखील राष्ट्रीय बंजारा परिषदे तर्फे खडसे यांच्या वक्तव्याचा निषेध करून खडसे यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन करण्यात आले होते. राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. मोहन चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
बंजारा समाजाची माफी मागावी - या प्रकरणी नांदेड शहरातील विमानतळ पोलीस ठाण्यात डॉ. मोहन चव्हाण यांनी खडसे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती. मोहन चव्हाण यांच्या तक्रारी नंतर राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकनाथ खडसे यांच्यावर ५०५/२ नुसार समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडसे यांनी बंजारा समजाबद्दल अपशब्द वापरल्याने बंजारा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. खडसे यांनी बंजारा समाजाची माफी मागावी तसेच खडसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी बंजारा समाजाने केली होती.
