नांदेड : आसना नदीत बैलगाडीसह मुलगा गेला वाहून; बैलगाडी मिळाली, मुलाचा शोध सुरू

author img

By

Published : Sep 24, 2021, 2:58 AM IST

वाहून गेलेला मुलगा

आसना नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाढ होत आहे. अशातच बैलगाडीसह नदी ओलांडण्याचा प्रयत्न करताना बैलगाडीसह मुलगा नदीत वाहून गेल्याची घटना गुरुवारी (23 सप्टेंबर) घडली आहे. काही अंतरावर बैलाचा मृतदेह व बैलगाडी सापडली असून मुलाचा अद्याप शोध सुरू आहे.

नांदेड - अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव येथील एक मुलगा बैलगाडीसह आसना नदी ओलांडताना एक मुलगा वाहून गेल्याची घटना गुरुवारी (दि. 23 सप्टेंबर) सायंकाळी घडली. यात बैलाचा मृतदेह व बैलगाडी सापडली असून मुलाचा शोध सुरू आहे. सुदर्शन इरबाजी झुंजारे (रा. बाळेगाव ता. नायगाव), असे बेपत्ता मुलाचे नाव आहे.

आसना नदीच्या पाण्याचा प्रवाहात वाढ होत आहे. पिंपळगाव (म.) येथील निवृत्ती बाळासाहेब देशमुख यांच्या शेतातील सालगड्याचा मुलगा सुदर्शन इरबाजी झुंजारे (रा. बळेगाव, ता. नायगाव) हा बैलगाडीसह नदी ओलांडत असताना वाहून गेल्याची घटना घडली. यावेळी शोध घेतला असता बैल मृतावस्थेत आणि गाडी पिंपळगावच्या शिवारात सापडली. मात्र, सुदर्शन हा अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे.

घटनास्थळी उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार उज्ज्वला पांगरकर, नायब तहसीलदार मारोतराव जगताप, पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी भेट दिली. एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले असून नदीच्या प्रवाहात वाढ होत असल्यामुळे आणि अंधारामुळे शोध मोहिमेला अडचण आल होती. रात्री उशीरापर्यंत सुदर्शनचा शोध लागला नव्हता.

हेही वाचा - मुखेडमध्ये सेफ्टी टँकमध्ये गुदमरून दोन युवक कामगारांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.