नांदेड : मालागाडीचा डबा रुळावरुन उतरल्याने मुंबई-सिकंदराबाद मार्गावरील वाहतूक काही काळ होती ठप्प

author img

By

Published : Sep 25, 2021, 2:51 AM IST

Updated : Sep 27, 2021, 1:23 AM IST

c

नांदेडकडे येणाऱ्या रेल्वे मालगाडीचा एक डबा शिवणगाव रेल्वे स्टेशनजवळ रुळावरून खाली उतरल्याची घटना शुक्रवारी (दि. 24 सप्टेंबर) घडली. यामुळे काही तास रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती.

नांदेड - नांदेडकडे येणाऱ्या रेल्वे मालगाडीचा एक डबा शिवणगाव रेल्वे स्टेशनजवळ रुळावरून खाली उतरल्याची घटना शुक्रवारी (दि. 24 सप्टेंबर) घडली. यामुळे काही तास रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. रेल्वेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या यंत्रणेने हा डबा पुन्हा रेल्वे रुळावर आणून रेल्वे सेवा सुरळीत केली.

शिवणगाव रेल्वे स्टेशन सिग्नलजवळ काही तांत्रिक कारणामुळे सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास नांदेडकडे येणाऱ्या एका मालगाडीचा डब रुळावरून खाली उतरल्याची घटना घडली. ही घटना घडल्यानंतर रेल्वेचे संबंधित अधिकारी, कर्मचारी तात्काळ शिवणगाव स्टेशन गाठून रेल्वे रूळाखाली उतरलेल्या मालगाडीचा डबा शर्थीचे प्रयत्न करून पुन्हा रेल्वे डबा रुळावर आणून रेल्वे वाहतूक सुरळीत केली.

रेल्वे डबा रुळावर आणण्याच्या या कामादरम्यान मुंबई ते सिकंदराबादकडे जाणारी देवगिरी एक्सप्रेस ही जवळपास एक तास उशिराने धावली तर अनेक मालगाड्या विविध स्टेशनजवळ थांबवून ठेवण्यात आल्या होत्या.

हेही वाचा - Next Chief of Air Staff : नांदेडचे भूमीपुत्र एअर मार्शल विवेक चौधरी होणार भारतीय हवाई दलाचे प्रमुख

Last Updated :Sep 27, 2021, 1:23 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.