Mumbai Bomb Blast Threat : मुंबईत बॉम्बस्फोट करण्याची धमकी नैराश्यातून; नांदेडच्या तरुणाला एटीएसकडून अटक
Published: May 24, 2023, 10:21 AM


Mumbai Bomb Blast Threat : मुंबईत बॉम्बस्फोट करण्याची धमकी नैराश्यातून; नांदेडच्या तरुणाला एटीएसकडून अटक
Published: May 24, 2023, 10:21 AM
मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला एटीएससह मुंबई पोलिसांनी अटक केली. नांदेड जिल्ह्यातील नावंदी गावातील श्रीपाद गोरठेकर असे त्याअटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून त्याने सीए परीक्षेत नापास झाल्याच्या नैराश्यातून ही धमकी दिली होती.
नांदेड : मुंबईत बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्या तरुणाच्या मुंबई एटीएसने मुसक्या आवळल्या आहेत. श्रीपाद गोरठकर असे त्या धमकी देणाऱ्या तरुणाचे नाव असून मुंबई एटीएसने त्याला अटक केली आहे. श्रीपाद गोरठेकरने परीक्षेत नापास झाल्याच्या नैराश्यातून ही धमकी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र या गंभीर प्रकरणाचा शोध घेऊन मुंबई पोलीस आणि नांदेडच्या 'दहशतवाद विरोधी पथकाने नायगाव तालुक्यातील नावंदी येथील श्रीपादला अटक केली आहे. त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याच्या चर्चेचीही त्याच्याकडे कसून चौकशी केली जात आहे.
परीक्षेत नापास झाल्याच्या नैराश्यातून धमकी : मुंबईमध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्याऱ्या नांदेड जिल्ह्यातील नावंदी येथील श्रीपाद गोरठेकर या १९ वर्षीय तरुणाला मुंबई क्राईम ब्रँचने अटक केली आहे. श्रीपाद गोरठकर हा तरुण नायगाव तालुक्यातील नावंदी येथील रहिवासी आहे. शिक्षणासाठी तो नांदेडला राहत होता. काही दिवसा पूर्वी श्रीपादने आपल्या ट्वीटर हॅन्डलरून मुंबईत विध्वसंक कृत्य करण्याची धमकी देणारा मॅसेज ट्वीट केला होता. सीए परीक्षेत नापास झाल्याच्या नैराश्येतून मुंबईत बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारे ट्विट श्रीपादने केले होते.
रात्री दोन वाजता पोलिसांनी आवळल्या मुसक्या : मुंबईत बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा मॅसेज केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली होती. ही बाब मुंबईच्या सायबर सेल आणि क्राईम ब्रँचला लक्षात आली. त्यानंतर मुंबईच्या सीआययु युनिटने तात्काळ कारवाई करत मॅसेज पाठवणाऱ्या तरुणाचा शोध घेतला. हा तरुण नांदेड जिल्ह्यातील नावंदी येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. मुंबई पोलिसांनी तात्काळ नांदेडचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना याबाबत माहिती दिली. सोमवारी रात्री 2 वाजताच्या सुमारास मुंबई क्राईम ब्रँचचे कर्मचारी नायगाव पोलिसांच्या मदतीने त्या तरुणांच्या घरी धडकले. त्यानंतर श्रीपाद गोरठेकरला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून तपासणी केल्यानंतर श्रीपादला घेऊन पोलीस मुंबईला रवाना झाले. श्रीपाद गोरठेकरचा ट्विटरवर आक्षेपार्ह मॅसेज करण्याचा काय उद्देश होता, मुंबईत विध्वसंक काय कृत्य करणार होता, हे तपासात निष्पन्न होणार आहे. मात्र श्रीपादच्या या कृत्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
मुंबई पोलिसांनी पाळली गुप्तता : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांचाही श्रीपाद गोरठेकरने आपल्या धमकीत उल्लेख केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र पोलिसांनी अधिकृतपणे याबाबतची काहीही माहिती दिली नाही. कारवाई दरम्यान मुंबई आणि नांदेड पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली. श्रीपाद गोरठेकरने ट्वीटर हॅन्डलवर काय मॅसेज केला होता, नेमकी काय धमकी दिली होती. याची माहिती नांदेड पोलिसांकडूनही देण्यात आली नाही. केवळ प्रेसनोट काढून आक्षेपार्ह पोस्ट टाकून पोलीस आयुक्ताना टॅग केल्याप्रकरणी त्याला अटक केल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र हा प्रकार उघडकीस आल्यानंतर उलटसुलट चर्चाना उधाण आले आहे.
हेही वाचा -
