Shyam Manav on Threat To Dhirendra Shastri : धीरेंद्र कृष्ण शास्त्री धमकी प्रकरणाशी काही घेणेदेणे नाही- श्याम मानव

Shyam Manav on Threat To Dhirendra Shastri : धीरेंद्र कृष्ण शास्त्री धमकी प्रकरणाशी काही घेणेदेणे नाही- श्याम मानव
बागेश्वर धामचे मुख्य पूजारी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना धमकी प्रकरणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या धमकी प्रकरणाशी आमचा काही सबंध नाही. तसेच माझ्या कार्यकत्याकडून कोणीही धमकी देणे शक्य नसल्याची शाम मानव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री जोपर्यंत दिव्य शक्ती सिद्ध करत नाही, तोवर ते महाठगच असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
नागपूर - बागेश्वर धामचे मुख्य पूजारी धीरेंद्र कृष्णशास्त्री यांना सुद्धा धमकी मिळाली असून या संदर्भात मध्यप्रदेश राज्यातील छतरपूर येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याविषयी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव म्हणाले की, या प्रकरणाची आमचं काही घेणं देणं नाही. कधी आम्हाला फोन आल्यास आमचे अनुभवी कार्यकर्ते पुढील व्यक्तीसोबत अतिशय सभ्यतेने बोलतात. धिरेंद्र कृष्ण शास्त्री जोपर्यंत आमचे आव्हान स्वीकारून आपली दिव्य शक्ती सिद्ध करत नाही, तोवर आम्ही त्यांना महाठग म्हणत राहू.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाठगच - जर बाबांनी आपली शक्ती सिद्ध केली तर, आम्ही माफी मागू. एवढ्या ढोंगी बाबांना आम्ही पर्दाफाश केला तरी, कधी आम्ही आक्रमक होऊन कोणाला धमकी दिली नाही. माझ्या कार्यकर्त्यांपैकी कोणीही धमकी देण्याची सुतराम शक्यता नसल्याचे श्याम मानव म्हणाले आहेत. सर्व प्रकरण गृह विभागाच्या अखत्यारीत आहे. मला वाय दर्जाची सुरक्षा आहे. मी कधी सुरक्षा मागितली नाही. आर आर आबा यांनी मला सुरक्षा दिली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या काळात वाय दर्जाची सुरक्षा वाय प्लस दर्जाची झाली.
माझ्यासह आईला सुद्धा धमकी - मला अजूनही धमकीचे फोन, मेसेज येत आहे. माझा 90 वर्षांच्या आईला सुद्धा धमकी दिली जात आहे. धीरेंद्र कृष्ण महाराज विरोधात अनेक पुरावे असताना गुन्हे दाखल केले जात नाही.आधी आम्ही गुन्हे दाखल व्हावे यासाठी प्रयत्न करू. त्यानंतर पुढे काय करायचे आम्ही ठरवू. मला धीरेंद्र कृष्ण महाराज या बाबाला तुरुंगात पाठवण्यात मुळीच रस नाही.
जादूगारांनी पुढे यावे - माझे सर्वांना आवाहन आहे की, ज्यानां ज्यांना वाटते की देशात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावे, त्यांनी त्यांनी समोर यावे. ज्या जादुगरांना बाबांच्या चमत्कारामागे हातचलाखी आहे, असे वाटते त्यांनी त्यांनी समोर यावे. लोकांना जागे करावे. कारण जादुगार लोकांना फसवत नाही, ते कला सादर करून लोकांना यामागे हातचलाखी असल्याचे सांगतात.
श्याम मानव यांच्या सुरक्षत वाढ - बागेश्वर धामचे मुख्य पूजारी पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना श्याम मानव यांनी थेट आव्हान दिले होते. त्यामुळे काही दिवसांपासून आव्हान- प्रति आव्हानाची लढाई ही वाढतच जात आहे. सध्या श्याम मानव हे नागपूरच्या रवी भवन येथील कॉटेज क्रमांक 16 मध्ये मुक्कामी आहेत. ते पुढील काही दिवस नागपुरातच राहतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्यानंतर काही उपाय योजना करण्यात आल्या आहेत. श्याम मानव यांना भेटण्यास येणाऱ्या प्रत्येकाची विचारपूस करून चौकशी केली जात आहे.
धीरेंद्र शास्त्रींनी स्वीकारले आव्हान - धीरेंद्र शास्त्रींनी किमान दहा लोकांवर चमत्कार सिद्ध केल्यास ३० लाख देऊ असे आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून देण्यात आले होते. त्यानंतर पंडित धीरेंद्र कुमार शास्त्री यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आव्हान स्वीकारले होते. अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्त्यांना दरबारात आमंत्रित करण्यात आल्याची माहिती पंडित धीरेंद्र कुमार शास्त्रींनी दिली होती. दिव्य शक्तीचा दावा शास्त्री नेहमीच करत असतात. त्यांचा हाच दावा सिद्ध करायचा असेल तर, फ्रॉड अँड प्रूफ कंडिशन खालीच खाली करता येईल. त्यासाठी पंडित धिरेंद्र कृष्णा शास्त्रींनी त्यांच्या सोयीने नागपुरात यावे. त्यांची संपूर्ण व्यवस्था ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून केली जाईल असे, देखील श्याम मानव यांनी स्पष्ट केले होते.
हेही वाचा - Devendra Fadnavis On MVA : महाविकास आघाडी सरकारच्या काळात, मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न - फडणवीस
