Sandalwood Smuggling  : चंदनाचे झाड तोडताना एकाला रंगेहाथ पकडले

author img

By

Published : Sep 28, 2022, 7:09 PM IST

Sandalwood Smuggling And Poaching

नागपूर शहरातील सीताबर्डी पोलिसांनी चंदनचे झाड तोडत असताना एका आरोपीला रंगेहाथ अटक केली ( One arrested while cutting sandalwood tree )आहे. तर एक आरोपी हा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरात चंदन चोरट्यांची एक टोळी सक्रिय झाली ( sandalwood smuggller gang active in Nagpur ) आहे.

नागपूर - नागपूर शहरातील सीताबर्डी पोलिसांनी चंदनचे झाड तोडत असताना एका आरोपीला रंगेहाथ अटक केली ( One arrested while cutting sandalwood tree )आहे. तर एक आरोपी हा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरात चंदन चोरट्यांची एक टोळी सक्रिय झाली ( sandalwood smuggller gang active in Nagpur ) आहे.

चंदनाचे झाड तोडताना एकाला अटक

चंदनाचे झाड तोडून नेले - या टोळीच्या सदस्यांनी शहरातील विविध भागात चंदनाचे झाडे तोडून नेले आहेत. दोन आरोपी चंदनाच्या झाडाची कत्तल करून चंदन चोरी करत आहेत अशी सूचना पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली आहे. आसिफ रफिक खॉ पठाण असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर शाबिर अजीज पठाण असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव असून ते जालना येथील रहिवासी आहेत.

औषधी वनस्पती नर्सरीचा व्यवसाय - या प्रकरणातील फिर्यादी नरसिंहकृष्ण घाटाटे यांचा आयुर्वेदचे चूर्ण वितरण, औषधी वनस्पती नर्सरीचा व्यवसाय आहे. त्यांनी घरच्या अंगणात अनेक औषधी वनस्पतीची लागवड केली आहे. आज पहाटे ४ वाजताच्या सुमारास दोन आरोपी त्यांच्या अंगणातील चंदनाचे झाड कापत असल्याचे लक्षात येताच त्यांनी लगेच सीताबर्डी पोलीस ठाण्यात सूचना दिली. माहिती समजताच सीताबर्डी पोलिसांनी घटनास्थळ गाठून एका आरोपीला रंगेहाथ अटक( Sitabardi police action against sandalwood smuggling ) केली. तर दुसरा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.

आरोपींचा जालना ते नागपूर दुचाकीने प्रवास - या प्रकरणातील आसिफ रफिक खॉ पठाण आणि शाबिर अजीज पठाण हे दोघेही जालना जिल्ह्यातील भोकरदन रहिवासी आहेत. ते दोघेही दुचाकीने जालना वरून नागपूरला आले होते, त्यांनी याआधी नागपूर शहरात अनेक ठिकाणी चंदनाचे झाड चोरून नेल्याच्या संशय आहे, आरोपींनी राजभवन येथील चंदनाचे झाडं चोरून नेले ( sandalwood smuggling and poaching )असावे. असा देखील संशय असल्याने पोलिसांनी त्याअनुषंगाने तपास सुरू केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.