Nitin Gadkari Threat Case : नितीन गडकरी धमकी प्रकरण, NIA च्या अधिकाऱ्यांनी केली 7 तास चौकशी
Published: May 26, 2023, 4:26 PM


Nitin Gadkari Threat Case : नितीन गडकरी धमकी प्रकरण, NIA च्या अधिकाऱ्यांनी केली 7 तास चौकशी
Published: May 26, 2023, 4:26 PM
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी दिल्या प्रकरणी एनआयएच्या अधिकाऱ्यांनी नागपूर पोलिसांकडून माहिती घेतली आहे. एनआयएच्या दोन अधिकाऱ्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडून 7 तास या प्रकरणी माहिती घेतली.
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात फोन करून घातपात घडविण्याच्या धमकी प्रकरणी एनआयएच्या दोन अधिकाऱ्यांनी चौकशी सुरु केली आहे. सिव्हिल लाइन्स मधील पोलिस जिमखाना येथे संबंधित तपास अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची तब्बल सात तास माहिती घेण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांनी केली 7 तास चौकशी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धमकी व खंडणी प्रकरणात नागपूर पोलिसांनी जयेश पुजारीला अटक केली आहे. सध्या जयेश हा नागपूर कारागृहात आहे. चौकशी दरम्यान त्याने अनेक नेत्यांना धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. या संवेदनशील प्रकरणाच्या तपासासाठी एनआयचे उपमहानिरीक्षक व अधीक्षक दर्जाचे दोन अधिकारी गुरुवारी सकाळी नागपुरात आले. त्यांनी प्रकरणाशी संबंधित नागपूर पोलिसांच्या अधिकाऱ्यांकडून सात तास माहिती घेतली. अधिकाऱ्यांनी या वेळी बंद दाराआड चौकशी केली. तसेच संबंधित दस्तऐवजांची पाहणी केली. अधिकाऱ्यांनी जयेश पुजारी बद्दल देखील माहिती घेतली. अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एनआयए आता तपासाची दिशा ठरवणार आहे. चौकशीनंतर दोन्ही अधिकारी मुंबईला रवाना झाले.
जयेश पुजारीला बेळगाव कारागृहातून अटक : या प्रकरणी नागपूर पोलिसांनी जयेश पुजारी या गुंडाला बेळगाव कारागृहातून अटक केली होती. बेळगाव कारागृहातून केलेल्या फोनचा सुगावा मिळाल्यानंतर ही अटक करण्यात आली. नागपूर पोलिसांच्या तपासात जयेश पुजारीचा दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे धागेदोर मिळाले आहेत.
काय आहे प्रकरण? : काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन करुन खंडणी मागण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर हा फोन बेळगावच्या कारागृहातून आल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आणि अखेर हा फोन जयेश पुजारी या गुंडांने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. जयेश पुजारी या गुंडाला कारागृहातूनच ताब्यात घेण्यात आले होते. जयेशचा दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयातून एनआयएने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
हेही वाचा :
