Devendra Fadnavis : अडीच वर्षांपासून मला संपवण्याचा प्रयत्न; देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

author img

By

Published : Sep 22, 2022, 1:12 PM IST

Etv Bharat

देवेंद्र फडणवीस यांची ही शेवटची निवडणूक आहे. असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी करण्यात आलं होतं. यावर देवेंद्र फडणवीस यांनी खरमरीत उत्तर दिले आहे. मुद्देही लाख बुरा चाहे तो क्या होता है जो होता है वही मंजूर ए तकदिर होता है या शायरीने उद्धव ठाकरेंना उत्तर दिलं ( Devendra Fadnavis reply to Thackeray through Shayari )आहे.

नागपूर - देवेंद्र फडणवीस यांची ही शेवटची निवडणूक ( Deputy CM Devendra Fadnavis ) आहे. असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी करण्यात आलं होतं. यावर देवेंद्र फडणवीस यांनी खरमरीत उत्तर दिले आहे. मुद्देही लाख बुरा चाहे तो क्या होता है जो होता है वही मंजूर ए तकदिर होता है या शायरीने उद्धव ठाकरेंना उत्तर दिलं ( Devendra Fadnavis reply to Thackeray through Shayari ) आहे.

देवेंद्र फडणवीस

मला संपवण्याचा प्रयत्न सुरू - 2019 ला माझा शेवट करण्याचा प्रयत्न केला होता. तिघांनी मिळून एकत्रितपणे अडीच वर्ष मला संपवण्याचा प्रयत्न केला. पण मला संपू शकले नाहीत. यापुढे संपवू शकणार नाहीत अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना ( Trio Tries To Finish Me Says Devendra Fadnavis ) दिली.

उद्धव ठाकरे निराशेच्या गर्केत - उद्धव ठाकरे यांचे कालचे भाषण निराशेचा अरण्यहृदयम आहे अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ज्यावेळी आमच्या सोबत निवडून येऊन आमच्या पाठीत खंजीर तुम्ही खूपसलाच त्यावेळी राजीनामे का दिले नाही असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. त्यावेळी निवडणुका का घेत नाही, तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले आमच्यासोबत निवडून आले होते. मोदींचे फोटो लावून निवडून आले होते. हिम्मत होती तर त्यावेळी राजीनामे देऊन निवडून यायचे होते, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.