Balasaheb Thackeray Jayanti : बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे साधणार शिवसैनिकांशी संवाद; कुणावर सोडणार बाण?
Updated on: Jan 22, 2023, 11:00 PM IST

Balasaheb Thackeray Jayanti : बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे साधणार शिवसैनिकांशी संवाद; कुणावर सोडणार बाण?
Updated on: Jan 22, 2023, 11:00 PM IST
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. उद्या सायंकाळी सायन येथील षमुखानंद हॉल येथे उद्धव ठाकरे यांनी जाहीर मेळावा आयोजित केला आहे. यात राज्य भरातून शिवसैनिक येणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई - 23 जानेवारी हा बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिवस. हा दिवस सर्वच शिवसैनिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. राज्यभरातील तमाम शिवसैनिक दादर येथील बाळासाहेब ठाकरे यांचे स्मुर्तीसस्थळाचे दर्शन घेत असतात. याच दिवसाचं औचित्य साधत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या सायंकाळी सहा वाजता शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. उद्या सायंकाळी सायन येथील षमुखानंद हॉल येथे उद्धव ठाकरे यांनी जाहीर मेळावा ठेवला आहे. या मेळाव्यात राज्यभरातून नेते आणि पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आल आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व शिवसैनिकांशी उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत. मात्र या कार्यक्रमाआधी मुंबईतील कुलाबा येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला जाऊन उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि सर्व ठाकरे कुटुंबीय कुटुंबीय अभिवादन करणार आहेत.
तैलचित्राच्या उपस्थित बाबत अद्याप स्पष्टता - बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाच्या औचित्य साधत शिंदे फडणवीस सरकारने विधानसभेच्या मुख्य सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे आणावरणाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या कार्यक्रम पत्रिकेत उद्धव ठाकरे यांचं नाव नसल्याने आधीपासूनच ठाकरे गटातील नेते आणि राज्य सरकार यांच्यात वाद सुरू आहे. विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे कुटुंबीयातील प्रत्येकाला आमंत्रण दिल असल्याचं सांगितलं आहे. मात्र या कार्यक्रमाला उपस्थित बाबत अद्याप उद्धव ठाकरे यांच्याकडून कोणतेही वक्तव्य केलं गेलेलं नाही. पण ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारच्या या कार्यक्रमावर राजकीय असल्याचा ठपका ठेवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय लोकांनी मिळून हा तैलचित्र अनावरणाचा कार्यक्रम ठेवला आहे मात्र साहेब ठाकरे यांच्यातील चित्राच्या अनावरणाचा हा कार्यक्रम असल्याने आपण यावर टीका करणार नाही असेही संजय राऊत मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.
मी गद्दार नाही - बाळासाहेब ठाकरे यांच्या उद्या होणाऱ्या जयंतीनिमित्ताने स्वतः सामनाच्या मुखपृष्ठावर एक जाहिरात दिली आहे. "साहेब मी गद्दार नाही. गेलेल्या 40 गद्दारांना काढून पुन्हा त्याच उमेदीने उभे राहू. तेव्हाच खऱ्या अर्थाने तुम्हाला अभिवादन केल्याचे समाधान आमच्यासारख्या शिवसैनिकांना होईल." अशी जाहिरात संजय राऊत, त्यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी दिली आहे. या जाहिरातीतून संजय राऊत यांनी पुन्हा एकदा थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बंडखोर 40 आमदार यांना टार्गेट केला आहे.
