Nana Patole Latest News : थोरातांचा राजीनामा, शिवसेनेची नाराजी, स्वपक्षीयांची टीका.. अशा करणांनी नाना पटोले आले अडचणीत
Updated: Feb 10, 2023, 7:42 PM |
Published: Feb 10, 2023, 5:40 PM
Published: Feb 10, 2023, 5:40 PM
Follow Us 


Nana Patole Latest News : थोरातांचा राजीनामा, शिवसेनेची नाराजी, स्वपक्षीयांची टीका.. अशा करणांनी नाना पटोले आले अडचणीत
Updated: Feb 10, 2023, 7:42 PM |
Published: Feb 10, 2023, 5:40 PM
Published: Feb 10, 2023, 5:40 PM
Follow Us 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या अडचणीत असल्याचे दिसत आहे. स्वपक्षीयांकडून टीका होत असतानाच आता आघाडीतील मित्र पक्षांनीही नानांवर टीकास्त्र चालवले आहे. काँग्रेसचा आक्रमक नेता म्हणून प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवलेल्या नाना पटोले या प्रमुख कारणांमुळे आले अडचणीत (Thorat Patole dispute)
मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आक्रमक नेता अशी ओळख असलेल्या पटोलेंनी काॅंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाच्चे सत्यजित तांबे यांना उमेदवारीन दिल्यामुळे सुरू झालेला वाद चांगलाच वाढत चालला आहे. थोरातांच्या राजीनाम्या नंतर नानांच्या विरोधाला चांगलीच धार येऊ लागली आहे यातच काँग्रेस पक्षातील नेते त्यांच्या विरोधात गेले आहेत सोबतच शिवसेना आणि आता महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनीही नानांवर शरसंधान करण्याची संधी या निमित्ताने साधून घेतली आहे. पाहुया नानां अजचणिीत आल्याची प्रमुख कारणे.
- महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहून आक्रमक ओबीसी नेता म्हणून काँग्रेस नेतृत्वाने नाना पटोले यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. तत्पूर्वी नाना पटोले यांनी आपल्या आक्रमक शैलीने विधानसभा आणि लोकसभा ही गाजवली. साकोली मतदार संघाचे आमदार असलेले नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेल यांचा पराभव करून भाजपचे खासदार म्हणून लौकिक मिळवला मात्र ते भाजपमधे फारसे रमले नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा स्वगृही येण्याचा निर्णय घेतला. 2019 च्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर नाना पटोले यांच्याकडे अतिशय महत्त्वाचे असे विधानसभा अध्यक्षपद सोपवण्यात आले वास्तविक नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्ष पदापेक्षा मंत्रीपदामध्ये अधिक रस होता म्हणूनच त्यांनी एक वर्षाच्या आतच विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नंतरच्या राजकीय परिस्थितीत आणि राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या उदासीनतेमुळे हे पद रिक्त राहिले. त्यानंतर नाना पटोले यांच्याकडे केंद्रीय नेतृत्वाने प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपवली.लोंढे सावंत
- विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नाना पटोले यांनी काँग्रेसमधील निष्ठावान कार्यकर्त्यांना बाजूला सारत आपल्या मर्जीतील लोकांना पदे दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यातील प्रमुख उदाहरण म्हणजे काँग्रेसचे धडाडीचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्या जागी अतुल लोंढे यांची मुख्य प्रवक्ते पदी केलेली नियुक्ती. हा वादाचा विषय ठरला यावर असलेली सचिन सावंत यांची नाराजी लपुन राहिली नव्हती. मर्जीतल्या कार्यकर्त्यांना पद दिल्याचे आरोप अनेक ठिकाणी झाले.चंद्रकांत हांडोरे
- विधान परिषदेत काँग्रेसच्या दोन उमेदवारांपैकी पहिल्या पसंतीचे उमेदवार असलेले चंद्रकांत हंडोरे यांचा धक्कादायकरीत्या पराभव झाला काँग्रेसमधील मतेच चंद्रकांत हंडोरे यांना मिळाली नाहीत आणि यामागे सुद्धा नाना पटोले यांचे राजकारण होते. अशी चर्चा त्यानंतर पक्षात काही काळ रंगली होती याबाबत केंद्रीय नेतृत्व आहे चौकशी समिती नेमून याबाबतीतला अहवाल ही मागवला होता. चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव काँग्रेसच्या ज्येष्ठ आणि निष्ठावान कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आणि तिथूनच नाना पटोले यांच्या नेतृत्वाबाबत नाराजी निर्माण व्हायला सुरुवात झाली.तांबे थोरात
- काँग्रेसचे विधान परिषदेचे माजी आमदार सुधीर तांबे यांचे पुत्र आणि काँग्रेस चे युवा नेतृत्व युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजित तांबे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्याबाबत केंद्रीय नेतृत्वाची तयारी असतानाही अचानक त्यांची उमेदवारी डावलण्यात आली. काँग्रेस पक्षातील नेत्यांना अंधारात ठेवून हा निर्णय परस्पर घेतला गेल्याचा आरोप करीत काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या पक्षनेतेपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला तसेच थोरात आणि तांबे यांनी नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप करीत त्यांनीच हे षडयंत्र रचल्याचा दावा केला नाना पटोले यांची भूमिका वादग्रस्त करण्यासाठी हे सर्वात मोठे आणि प्रबळ कारण ठरले आहे.विजय वड्डेट्टीवार
- काँग्रेसचे माजी मंत्री माजी प्रदेशाध्यक्ष आणि ओबीसी समाजाचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही नाना पटोले यांच्यावर टीका करीत महाविकास आघाडी अडचणीत येण्यासाठी एक प्रकारे नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा कारणीभूत असल्याचा दावा केला. विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या या वक्तव्याला विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनीही दुजोरा दिला जर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर आता राज्यात वेगळे चित्र दिसले असते असे म्हणत त्यांनीही नानांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.उध्दव ठाकरे
- दरम्यान महाविकास आघाडी सरकार कोसळण्यासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेला राजीनामा हा सर्वात महत्त्वाचे कारण ठरला आहे जर नाना पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला नसता तर विधानसभा अध्यक्षपद महाविकास आघाडीकडे राहिले असते आणि पुढील सर्व नाट्य टळले असते. त्यामुळे नानांनी दिलेला राजीनामा महाविकास आघाडी सरकार साठी आत्मघातकी ठरला अशी टीका सामना मधून झाल्यामुळे शिवसेना आणि एकूणच महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी या निमित्ताने नाना पटोले यांच्यावर शरसंधान केले आहे.

Loading...