Devendra Fadnavis On MVA : महाविकास आघाडी सरकारच्या काळात, मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न - फडणवीस

author img

By

Published : Jan 24, 2023, 3:11 PM IST

Devendra Fadnavis Allegation Of MVA

महाविकास आघाडी सरकारच्या काळात, मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला. तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडेंना हे टार्गेट देण्यात आल्याचा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. एका वृत्तवाहिनीच्या जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच त्यांच्यातील कटूतेवर त्यांनी भाष्य केले. मातोश्रीचे दरवाजे आपल्याला बंद केल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मुंबई - राज्यात 2019 पासून राजकीय श्रेत्रात मोठी उलथापालथ होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना हाताशी धरत सत्ता स्थापन करत शिवसेनेला चार हात लांब केले. शिवसेनेने याचा वचपा काढण्यासाठी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची स्थापना करत सत्ता स्थापन केली. अडीच वर्षे सत्तेचा कारभार पाहिला. एकनाथ शिंदे यांच्या बंडाने महाविकास आघाडीच्या सत्तेला सुरुंग लागला. भाजप, शिंदे गटाचे सरकार सत्तेवर आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागली.

नेत्यांवर कारवाईचा बडगा - देवेंद्र फडणवीस यांनी या सत्तांतरावर एक वाहिनींवर खुलासा केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठवली. महाविकास आघाडी सरकार काळात केंद्रीय तपास यंत्रणांनी आघाडीच्या अनेक नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला. ईडीच्या धाकाने शिंदे गटाने भाजपची साथ दिल्याचा आरोप विरोधकांकडून सुरु आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांना प्रत्युत्तर दिले. तसेच ठाकरे सरकारच्या काळामध्ये मला जेलमध्ये टाकण्याचे प्रयत्न होते.

मला जेलमध्ये टाकण्याचे प्रयत्न - मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली होती. कोणतेही काम मी केले नव्हते. किंवा कोणती चूक केली नव्हती. त्यामुळे मला जेलमध्ये टाकू शकले नाहीत. त्यांचे प्रयत्न असफल झाल्याचा दावा, फडणवीस यांनी केला. एकेकाळी जीवलग मित्र असलेले उद्धव ठाकरे, फडणवीस यांच्यात सध्या राजकीय वैर वाढल्याच्या प्रश्नांवर ही फडणवीसांनी भाष्य केले. माझे कोणाशी वैर नाही. मी कोणाशीच राजकीय वैर धरत नाही.

माझे त्यांच्यासोबत वैर नाही - आजही त्यांच्याशी वैर नाही. राजकीय दृष्ट्या निश्चितपणे मी त्यांचा विरोधक आहे. अतिशय ताकदीने मी त्यांचा विरोध करेन, पण वैयक्तिक आजही माझे त्यांच्यासोबत वैर नाही. आजही त्यांच्यासोबत मी चहा पिऊ शकतो. त्यांच्याशी मी गप्पा मारु शकतो. परवा एका कार्यक्रमात मला रश्मी वहिनी भेटल्या. त्यावेळी मी वहिनीशी ही बोललो. त्यावेळी त्यांना ही सांगितले की, उद्धवजींना माझा नमस्कार सांगा. कारण महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. त्या संस्कृतीच्या पलिकडे मी कधीच जाणार नाही. परंतु, पाच वर्ष आपण ज्यांच्यासोबत काम करत आहोत.

मोठे सरप्राईज देणार - मी अनेकदा ठाकरेंना फोन केले मात्र, त्यांनी माझे फोन घेतले नाहीत. तसेच मातोश्रीचे दरवाजे देखील माझ्यासाठी बंद केले, अशी खंत व्यक्त त्यांनी व्यक्त केली. हे त्यांनी केले की, इतर कोणी केले माहीत नाही, असे ही ते म्हणाले. फडणवीस यांनी ए. बी. सी असे प्लान केले आहेत. त्यापैकी अजित पवार, एकनाथ शिदे, सी म्हणजे अशोक चव्हाण असल्याचे सागंण्यात या प्रश्नांवर, फडणवीसांनी 2024 पर्यंतचे सगळी सरप्राईजेस संपली आहेत. आता 2024 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी अनेक मोठे सरप्राईजेस तुम्हा सर्वांना निश्चितपणे देणार आहोत. सध्या तरी प्लान ए, बी, सी काहीच नाही. आता सगळे प्लान गव्हर्नन्स आहे.

गव्हर्नन्सवर फोकस - आम्हाला सध्या गव्हर्नन्सवर फोकस करायचा आहे. आम्हाला महाराष्ट्र जो मधल्या अडीच वर्षात थांबला होता. विकास होत नव्हता, तो महाराष्ट्र आम्हाला पुन्हा त्या ग्रोथ पाथवर आणायचा आहे. हेच आमचे ध्येय आहे, असे फडणवीस म्हणाले. राज्यपालांच्या पदमुक्तीवर ही त्यांनी भाष्य केले. तसेच मंत्री मंडळ विस्तार देखील अर्थसंकल्पापूर्वी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - Rahul Gandhi On Surgical Strike: सर्जिकल स्ट्राईकबाबत दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्याशी सहमत नाही: राहुल गांधी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.