ETV Bharat / state

Smuggling Of Tiger Parts: पट्टेरी वाघाची कातडी तसेच पंजाची तस्करी करणाऱ्या तिघांना मुंबईतून अटक

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 18, 2023, 6:15 PM IST

Smuggling Of Tiger Parts: पट्टेरी वाघाची कातडी तसेच पंजाची तस्करी करणाऱ्या तिघांना मुंबईतील एम एच बी कॉलनी पोलिसांनी अटक केली आहे. जप्त केलेल्या वाघाची कातडी आणि पंजाची किंमत दहा (Smuggling Of Tiger Parts) लाख इतकी आहे. आरोपींची नावे सुरज लक्ष्मण कारंडे (वय 30), मोहसिन नजीर जुंद्रे (वय 35 वर्ष), (tiger skins and claws) मंजूर मुस्तफा मानकर, (वय 36 वर्ष), अशी आहेत. हे तिघेही सातारा येथील महाबळेश्वर परिसरात राहणारे आहेत. (Mumbai Crime)

Smuggling Of Tiger Parts
वाघाच्या कातड्याची तस्करी

मुंबई (Smuggling Of Tiger Parts): राष्ट्रीय प्राणी असलेल्या पट्टेरी वाघाची कातडी व पंज्यांची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना एमएचबी कॉलनी पोलिसांनी पकडून अटक केली आणि या तस्करांकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी एम एच बी कॉलनी पोलीस ठाण्यात कलम 9, 39(3), 44, 48(अ), 49(ब), 51 वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना काल उशिरा रात्री अटक करण्यात आलीय.

गुप्त माहितीच्या आधारे कारवाई: गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अखिलेश बोंबे यांना गुप्त बातमीदारामार्फत गोपनीय माहिती मिळाली की, काही जण हे महाबळेश्वर येथून वाघाच्या कातड्यांची व नखे यांची तस्करी करून विक्री करण्यासाठी एलआयसी ग्राउंड बोरवली पश्चिम मुंबई येथे येणार आहेत. पोलीस उपनिरीक्षक बोंबे यांनी तात्काळ वरील माहिती पोलीस निरीक्षक सचिन शिंदे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांना दिली.

मुद्देमाल हस्तगत: वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी याची माहिती पोलीस उपायुक्त अजय कुमार बंसल यांना दिली. परिमंडळ अकराचे पोलीस उपायुक्त अजय कुमार बन्सल यांनी गुप्त बातमीची खात्री करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. एम एच बी कॉलनी पोलीस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन शिंदे (गुन्हे), सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र शिंदे, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अखिलेश बोंबे, पोलीस हवालदार प्रवीण जोपळे, पोलीस हवालदार संदीप परीट, पोलीस शिपाई प्रशांत हुबळे, पोलीस शिपाई गणेश शेरमाळे यांनी सापळा रचून मोठ्या मेहनतीने या तीन तस्करांना ताब्यात घेतले.

10 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त- एमएचबी कॉलनी पोलीस ठाणेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाखो रुपये किमतीचे पट्टेरी वाघाचे सोलून काढलेले कडक झालेले व सुकलेले काळे व पिवळे पट्टे असलेले कातडे व 12 वाघ नखे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. काळे पिवळ्या रंगाचे पट्टे असलेले वाघाचे कातडे त्याची लांबी 114 सेंटीमीटर व रुंदी 108 सेंटीमीटर तसेच 12 वाघ नखे आहेत. त्याची अंदाजे किंमत 10 लाख 60 हजार रुपये इतकी आहे.

हेही वाचा:

  1. Sex With Dog : कुत्र्यासोबत अनैसर्गिक सेक्स करताना पकडलं, गुन्हा दाखल
  2. Call About Bomb In Mumbai : 'मुंबईतील काही लोक बॉम्ब बनवत आहेत', पोलिसांना आला धमकीचा कॉल; तपास केला असता...
  3. Pune Murder News : पुर्ववैमनस्यातून 17 वर्षीय मुलाचा लोखंडी हत्याराने खून, सांस्कृतिक राजधानीत गुंडाराज वाढलं?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.