New Parliament inauguration : संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनातील फोटो हुकूमशाहीचे प्रतिम मानले जाईल-ठाकरे गट
Published: May 25, 2023, 10:38 AM


New Parliament inauguration : संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनातील फोटो हुकूमशाहीचे प्रतिम मानले जाईल-ठाकरे गट
Published: May 25, 2023, 10:38 AM
नवीन संसदेच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा 28 मे रोजी आहे. देशभरातील 19 विरोधी पक्षांनी या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकला असताना ठाकरे गटानेदेखील सोहळ्यात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई: नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकण्यावर देशभरातील विरोधी पक्ष ठाम आहेत. कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याच्या विरोधकांच्या निर्णयावर सत्ताधारी भाजपने कडाडून टीका केली आहे. या टीकेला ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावेळी काढण्यात आलेले फोटो हे संसदेच्या अपमानाची आठवण करू देणार आहेत, असे चतुर्वेदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
संसदेच्या उद्घाटन समारंभात विरोधी पक्षांचे नेते नसल्याने ते फोटो म्हणजे हुकूमशाहीचे प्रतिक मानले जाईल, अशी घणाघाती टीका खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे. संसदेच्या उद्घाटनाला अनुपस्थित राहिल्याने विरोधकांचे नुकसान होईल, अशी भाजपने टीका केली आहे. त्यावर ठाकरे गटाच्या खासदार चतुर्वेदी यांनी इतिहास साक्ष देईल, असे म्हटले आहे. जेव्हा नवीन संसदेच्या कार्यक्रमाचा फोटो दिसेल, त्यात विरोधी पक्षाचा नेता दिसणार नाही. तेव्हा राष्ट्रपतींचा अपमान देशाला आठवेल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
-
संसद के उद्घाटन में ना जाने से विपक्ष का नुकसान होगा जैसा ज्ञान देने वाले भूल रहे हैं कि इतिहास इसका साक्षी होगा।
— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) May 24, 2023
जब जब नयी संसद की तस्वीर देखी जाएगी और विपक्ष का कोई भी नेता उसमें नहीं दिखेगा, तब तब राष्ट्रपति का अपमान देश याद करेगा।
वह तस्वीर तानाशाही का प्रतीक कहलाएगी।
राष्ट्रपतींना निमंत्रित न केल्यामुळे विरोधी पक्षांचा बहिष्कार- ठाकरे गटाचे नेते संजय राऊत बुधवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले, की शिवसेना ( उद्धव ठाकरे गट) इतर विरोधी पक्षांसोबत नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या संसदेच्या प्रमुख आहेत. मोदी सरकारने त्यांना 28 मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी आमंत्रित न करून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. सरकारने एका आदिवासी महिलेला, राष्ट्रपतींना निमंत्रित न केल्यामुळे सर्व विरोधी पक्षांचे नेते या कार्यक्रमावर बहिष्कार घालणार असल्याचे राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. नवीन संसद भवनाची गरज नाही. कारण सध्याची इमारत आणखी 100 वर्षे टिकली असती, असा दावादेखील संजय राऊत यांनी केला आहे.
विरोधकांवर फडणवीस यांची टीका- नवीन संसदेचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी करावे, अशी विरोधकांची मागणी आहे. दुसरीकडे देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच करणार असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संसदेचे उद्घाटन यापूर्वी इंदिरा गांधी यांनी केले होते, याची आठवण करून दिली आहे. विरोधकांचा लोकशाहीवर विश्वास नसल्याची टीकादेखील फडणवीस यांनी केली आहे.
हेही वाचा-
- New Parliament Building : कॉंग्रेससह 19 विरोधी पक्षांचा नव्या संसद इमारतीच्या उद्घाटनावर बहिष्कार
- Amit Shah Statement On Central Vista : संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदीच करणार, गृहमंत्री अमित शाहांनी ठणकावले
- Sanjay Raut On Pm : राष्ट्रपतींना नव्या संसद भवनच्या उद्धाटनाला न बोलवणे हा देशाचा अपमान, विरोधी पक्ष करणार बहिष्कार - संजय राऊत
