Sanjay Raut Hearing : न्यायमूर्ती कर्णिक यांच्या खंडपीठासमोर संजय राऊत प्रकरणाची सुनावणी

author img

By

Published : Nov 21, 2022, 9:46 PM IST

Updated : Nov 21, 2022, 10:59 PM IST

Sanjay Raut case hearing

शिवसेना नेते संजय राऊत ( Shiv Sena leader Sanjay Raut ) यांच्या विरोधातील ईडीने याचिका ( ED petition against Sanjay Raut ) दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या बेंचसमोर सुनावणी होणार होती. मात्र 25 नोव्हेंबरला न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या बेंचसमोर सुनावणी होणार आहे. अंतर्गत विभागीय कामकाजाच्या सोईनुसार ही सुनावणी कर्णिक यांच्यापुढे होईल.

मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत ( Shiv Sena leader Sanjay Raut ) यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने ( Special PMLA Court ) दिलेला जामीन रद्द करण्यात यावा याकरिता ईडीने ( ED petition against Sanjay Raut ) मुंबई उच्च न्यायालयात ( Bombay High Court ) धाव घेतली होती. या याचीकेवर दोन वेळा न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या बेंच समोर सुनावणी करण्यात आली होती त्यावेळी भारती डांगरे यांनी ईडीला कुठलाही दिलासा देण्यास नकार दिला होता.

पुन्हा याचिका दाखल करण्याचे निर्देश - ईडीला या प्रकरणात सुधारित मुद्देसह पुन्हा याचिका दाखल करण्याचे निर्देश मागील सुनावणी दरम्यान देण्यात आले ( ED directed to file petition again against Sanjay Raut ) होते. त्यानंतर याचीकेवर सुनावणी 25 नोव्हेंबर पर्यंत तहकूब करण्यात आली होती.

एम. एस. कर्णिक यांच्या बेंच समोर होणार सुनावणी - न्यायमूर्ती भारतीय डांगरे यांच्या बेंच समोर गुन्हेगारी प्रकरणाची सुनावणी करण्यात येत होती. आता त्यांच्या बेंच समोर सिविल प्रकरणाची सुनावणी करण्यात येणार असल्याने संजय राऊत यांच्या याचिकेवर सुनावणी आता न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या बेंच समोर होणार ( Justice Karnik ) आहे. हे करण्यात आलेले बदल हे प्रशासकीय न्यायालयीन बदल असल्याचे माहिती प्राप्त झाली आहे.

Last Updated :Nov 21, 2022, 10:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.