Rahul Shewale Defamation Case: बदनामीच्या खटल्यातून आमचे नावं वगळा.. उद्धव ठाकरेंसह संजय राऊत यांचा न्यायालयात अर्ज दाखल

Rahul Shewale Defamation Case: बदनामीच्या खटल्यातून आमचे नावं वगळा.. उद्धव ठाकरेंसह संजय राऊत यांचा न्यायालयात अर्ज दाखल
राहुल शेवाळे यांनी केलेल्या मानहानीच्या खटल्यातून दोषमुक्तता मिळावी यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी माझगाव न्यायालयात अर्ज केला.
मुंबई - शिवसेनेचे ( शिंदे गट) खासदार राहुल शेवाळे यांच्याबाबत कथित बदनामीकारक मजकूर माध्यमामधून प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानंतर 100 कोटी रुपयांचा मानहानी खटला दाखल केला होता. त्याबाबत आज माजगाव न्यायालयात सुनावणी झाली असता उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि संजय राऊत यांनी दोष मुक्ततेसाठी अर्ज केला. या खटल्यातून त्यांचं नाव वगळावं असे त्यात नमूद केले. न्यायाधीश एस. बी. काळे यांच्या न्यायालयात हा दोष मुक्तीचा अर्ज दाखल केला. हा अर्ज आज दाखल करण्यात आला.
(पी आर बी )वृत्तपत्र अधिनियम 1867 नुसार वर्तमानपत्राने जो घोषित संपादक नमूद केलेला आहे, तोच पीआरबी अधिनियमानुसार जबाबदार असतो. त्यामुळे त्याच्याशिवाय इतर कोणीही त्यासंदर्भात जबाबदार नसतात. परिणामी खासदार संजय राऊत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची नावं त्यातून वगळली जावीत, असेदेखील अर्जामध्ये वकिलांनी नमूद केलेले आहे. वकिलांनीहादेखील मुद्दा सुनावणीच्या दरम्यान मांडला. आपल्यावरील आरोप पूर्णपणे अस्पष्ट आणि चुकीचे आहेत, असा त्यांनी अर्जात दावा केला आहे.
पुढील सुनावणी 16 ऑक्टोबरला होणार- वर्तमानपत्राच्यावतीने सहाय्यक संपादक अतुल जोशी हे कोणत्याही बातमींच्या संदर्भात जबाबदार आहेत आणि राहतील. कायदेशीर जबाबदारी त्यांच्यावरच आहे. त्यामुळेदेखील तर्कसंगत रीतीने त्यांच्याशिवाय इतर कोणालाही यासंदर्भात जबाबदार धरणे न्यायोचित होणार नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि संजय राऊत यांच्या वकिलांनी न्यायालयात हा अर्ज सादर केल्यानंतर न्यायालयाने राहुल शेवाळे यांना यावर आपले लेखी म्हणणे मांडा असे निर्देश दिले. या प्रकरणी पुढील सुनावणी 16 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे
राहुल शेवाळे यांचे कराचीत हॉटेलमध्ये असल्याचा केला होता दावा- २९ डिसेंबर २०२२ रोजी प्रकाशित झालेल्या माध्यमात राहुल शेवाळे यांचा कराचीत हॉटेल आणि रिअल इस्टेट व्यवसाय आहे, असे म्हटले होते. यावर खासदार राहुल शेवाळे यांनी आक्षेप घेतलाय. तक्रारदाराच्या प्रतिष्ठेला आणि राजकीय कारकीर्दीला हानी पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचा युक्तीवाद यापूर्वी राहुल शेवाळे यांच्या वकिलांनी केलाय. लोकांसमोर त्याची प्रतिमा खराब करण्यासाठी खोटे आरोप लावले जात असल्याचेही खासदार शेवाळे यांच्या वकिलांनी यापूर्वी म्हटले आहे.
हेही वाचा-
