Balasaheb Thackeray Birth Anniversary : एनडीएतून बाहेर पडूनही पंतप्रधान मोदींनी बाळासाहेब ठाकरेंचे स्मरण करत केले कैतुक

Balasaheb Thackeray Birth Anniversary : एनडीएतून बाहेर पडूनही पंतप्रधान मोदींनी बाळासाहेब ठाकरेंचे स्मरण करत केले कैतुक
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. जयंतीनिमित्त आज सर्वपक्षीय नेते मंडळी कार्यक्रमाच्या माध्यमातून व सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करत आहेत. याचपार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट वरून आदरांजली वाहिली आहे.
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज दिवसभर सर्वत्र कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातून कार्यकर्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी येत आहेत. विशेषकरून शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्ष या दोन्ही पक्षांकडून आज दिवसभरात विविध समाजउपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही गटाकडून आज जोरदार शक्तिप्रदर्शनही केले जाणार आहे. तसेच कुलाबा रिगल सिनेमा सर्कल येथील शिवेसनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे संध्याकाळी कुटुंबासह येणार आहेत. तसेच याच ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दुपारी अभिवादन करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळत आहे.
-
Indeed Sir, He will be remembered forever as an outstanding leader who always stood with the people.#BalaSaheb pic.twitter.com/XrugfNtNKx
— Nishant🇮🇳 (@iNishant4) January 23, 2023
पंतप्रधान मोदी यांनी वाहिली आदरांजली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांना 97 व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. त्यांनी आपले जीवन लोककल्याणासाठी समर्पित केले. कट्टर हिंदुत्वाच्या राजकारणाच्या सुरुवातीच्या प्रवर्तकांपैकी एक असलेल्या मराठा नेत्यांसोबतच्या त्यांच्या संवादाची ते नेहमीच कदर करतील, ज्यांना मोठ्या संख्येने अनुयायी आहेत असे मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट : 'बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण करत आहे. त्यांच्याशी झालेल्या विविध संवादांची मी नेहमीच कदर करतो. त्यांना विपुल ज्ञान आणि बुद्धी लाभली होती. त्यांनी आपले जीवन लोककल्याणासाठी समर्पित केले, असे पंतप्रधानांनी ट्विट केले. विविध राजकीय पक्षांचे नेते सोशल मीडियाच्या माध्यमातून बाळासाहेबांना आदरांजली वाहत आहेत.'
राज ठाकरे यांनी भावना व्यक्त केल्या : आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण राज्यभरातून भावनिक पडसाद उमटत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे आज मुंबईतील विधानभवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. हे चित्र चित्रकार चंद्रकला कदम यांनी साकारलेले आहे. विशेष म्हणजे आज बाळासाहेब ठाकरे यांची ९७वी जयंती असून तैलचित्र अनावरण सोहळ्याला अनेक राजकीय मंडळी उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमाचे आमंत्रण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांचे कुटुंबिय आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांना देखील देण्यात आले आहे. त्यामुळे आज एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार असल्याची चर्चा रंगली आहे.
