ETV Bharat / state

राज्यात सर्वत्र रस्त्यांची दुर्दशा, खड्ड्यांमधूनच वाहन चालकांचा जीवघेणा प्रवास

author img

By

Published : Aug 28, 2020, 11:39 AM IST

Updated : Sep 1, 2020, 9:13 PM IST

गेल्या आठवड्याभरात राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे आधीच खराब झालेल्या रस्त्यांची आता चांगलीच दुर्दशा झाली आहे. कोरोना नियंत्रणात प्रशासन गुंतले असल्याने रस्ते दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे परिणामी वाहन चालकांना खड्ड्यांमधून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. पाहुयात राज्याच्या विविध जिल्ह्यांमधील रस्त्यांची परिस्थिती....

रस्त्यांची दुर्दशा
रस्त्यांची दुर्दशा

मुंबई - सध्या जगभरासह राज्यावरही कोरोनाचे गंभीर सावट असून त्याजोडीला गेल्या आठवड्याभरात राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे आधीच खराब झालेल्या रस्त्यांची आता चांगलीच दुर्दशा झाली आहे. कोरोना नियंत्रणात प्रशासन गुंतले असल्याने रस्ते दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे परिणामी वाहन चालकांना खड्ड्यांमधून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. पाहुयात राज्याच्या विविध जिल्ह्यांमधील रस्त्यांची परिस्थिती....

रस्त्यांची अवस्था

जळगाव - जिल्ह्यातील सर्वच प्रमुख रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. जिल्ह्यात गेल्या आठवड्यात संततधार पाऊस सुरू होता. पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 ची तर अवस्था अतिशय वाईट आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खोदकाम केलेले असल्याने वाहनधारकांना खूप अडचणी येत आहेत. पावसामुळे महामार्गाची खूप वाईट अवस्था झाली आहे. धुळे जिल्ह्यातील फागणे ते जळगाव तालुक्यातील तरसोद आणि तरसोद ते बुलढाणा जिल्ह्यातील चिखली अशा दोन टप्प्यात या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम होणार आहे. परंतु, फागणे ते तरसोद या टप्प्याचे काम रखडले आहे. दुसरीकडे जळगाव ते औरंगाबाद महामार्गावर काही ठिकाणी काम अपूर्ण असल्याने अडचणी आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था पावसामुळे अतिशय वाईट झाली आहे. अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून खडी उन्मळून बाहेर आली आहे.

रायगड - जिल्ह्यातून मुंबई-गोवा महामार्ग जात असून कशेडी घाटापर्यंत जिल्ह्याची हद्द आहे. पळस्पे ते इंदापूर हा पहिल्या टप्यातील रस्ता आहे. पावसाळ्यात पेण ते इंदापूरपर्यंत महामार्ग रस्ता हा पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे गणेशोत्सव सणाला येणा-जाणाऱ्या चाकरमान्यांना खड्डेमय रस्त्यानेच यावे लागत आहे. खड्डेमय रस्ता असल्याने वाहने ही होडीसारखी डुलत डुलत जाताना दिसतात. अलिबाग रामराज मार्गे रोहा, पेझारी नागोठणे, रेवदंडा मुरुड हे अंतर्गत रस्तेही पावसामुळे खड्डेमय झाले आहेत. रस्त्याच्या निकृष्ट, अवेळी कामामुळे आणि राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षतेमुळे जिल्ह्यातील महामार्ग अंतर्गत रस्त्याची दुर्दशा कारणीभूत ठरली आहे.

वाशिम - जिल्ह्यातील जऊळका येथील काटेपूर्णा नदीच्या पुलावर पडलेल्या खड्यांमुळे मुंबई-नागपूर महामार्गावर वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. पूल अतिशय जीर्ण झाला असतानाही त्यावरून जड वाहतूक होत आहे. पुलावर असणारे खड्डे दरदिवशी अपघातास आमंत्रण देत आहेत. हे खड्डे चुकवण्याचा प्रयत्न वाहनधारक करीत असल्याने एखाद्या वेळी मोठा अपघात होण्याची भीती आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन पुलाच्या डागडुजीचे काम करण्याची मागणी होत आहे.

जालना - अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था बिकट आहे. जालना-औरंगाबाद रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर दोन ठिकाणी पथकर नाके आहेत. मोठ-मोठे खड्डे पडल्यामुळे पावसाचे पाणी साचल्यानंतर या खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि वाहनांचे नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. त्यामुळे रस्त्यावर धूळही साचली आहे. जालना शहरात देखील प्रत्येक भागामध्ये रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. दोन वर्षांपूर्वी शहरात सर्वत्र सिमेंटचे रस्ते तयार करण्यात आले होते. या रस्त्यांवर देखील आता खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. रस्त्यांच्या बाजूला बसविलेले सिमेंट गट्टू देखील आता उखडून जात आहेत. त्यामुळे या रस्त्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान ग्रामीण भागातही ज्याठिकाणी अवजड वाहतूक आहे, अशा रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. एकंदरीत मागील महिन्याभरात पडलेल्या पावसामुळे रस्त्यांची दाणादाण उडाली आहे.

गोंदिया - जिल्ह्यात मागील आठवड्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यातच १९ ऑगस्ट (गुरुवार) सायंकाळपासून २० ऑगस्टच्या सकाळपर्यंत पडलेल्या जोरदार पावसामुळे अनेक रस्ते बंद झाले आहेत. तिरोडा-तुमसर मार्गावरील भिसी नाल्याजवळील कच्चा पूल वाहून गेला, त्या मार्गावरील वाहतूक बंद पडून संपर्क तुटला होता. त्याचप्रमाणे गोंदिया शहरातील सखल भागातही पाणी साचले होते. सालेकसा तालुक्यातही अनेक रस्ते बंद होते. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील अनेक मार्गांवर खड्डे पडले आहेत. त्यातून वाहनांना ये-जा करण्यासाठी कमालीची कसरत करावी लागत आहे. गोंदिया व गडचिरोली या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या, सडक-अर्जुनी तालुक्यातून जाणाऱ्या गोंदिया-कोहमारा-नवेगावबांध महामार्गावर जागोजागी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावर असलेल्या पुलावरदेखील मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात सर्व रस्ते सुमारे साडेआठ हजार किलोमीटर लांबीचे आहेत. सध्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पर्यायी मार्ग आणि 'सर्व्हिस' मार्गावरून वाहतूक सुरू आहे. या मार्गाच्या सर्व्हीस मार्गांची अवस्था अत्यंत वाईट आहे. कणकवली सारख्या शहरात सध्या चिखलमय मार्गातून प्रवास करावा लागतो. तालुक्यातील महत्त्वाच्या भागांना जोडणारे साडेपाच हजार किलोमीटर लांबीचे रस्ते हे जिल्हा परिषदेच्या ताब्यात आहेत. या रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते हे वळणा-वळणाचे आहेत. ते डोंगर कपारीतून जातात. त्यामुळे अतिवृष्टीत या मार्गांची अवस्था सध्या अत्यंत वाईट बनली आहे. जिल्हा परिषदेच्या ताब्यात एकूण २ हजार ८३० एवढे रस्ते असून या मार्गांची अवस्था सर्वात वाईट आहे.

रत्नागिरी - सध्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजू झाल्या आहेत. तर काही ठिकाणी अद्याप मोठ्या प्रमाणात काम रखडलेले आहे. दरम्यान, सद्यस्थितीत असलेला रस्ता काही ठिकाणी खड्ड्यात गेल्याचे चित्र आहे. वाहन चालकांना गाडी चालवताना रस्ता शोधावा लागतो, अशी स्थिती महामार्गावर काही ठिकाणी आहे. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील आरवली ते चिपळूण दरम्यान महामार्गाची अवस्था अतिशय दयनीय आहे. काही ठिकाणी खड्डे भरण्यात आले, मात्र पावसामुळे स्थिती पुन्हा जैसे थे असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाहन चालकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

नांदेड - जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गांचे मोठे जाळे निर्माण होत असून अनेक रस्त्यांचे काम सुरू आहे. त्यातच या राष्ट्रीय महामार्गांसह अनेक रस्त्यांवर पावसामुळे मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. यामुळे अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून या खड्डयांनी अनेकांचे बळी घेतले आहेत. तुळजापूर-नागपूर, कल्याण ते निर्मल राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. पण या कामांची गती प्रचंड संथ असून दोन्ही बाजूंनी रस्ते खोदून ठेवले आहेत. रस्त्यावर माती-मिश्रीत खडक टाकण्यात आला आहे. पावसामुळे सर्वच राष्ट्रीय महामार्गांवर चिखल निर्माण होत असून एखाद्या शेतात जाणाऱ्या रस्त्यापेक्षाही वाईट स्थिती आहे. त्यातच एक-दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली तर मोठ्या प्रमाणात धूळ उडते. यामुळे वाहन चालविताना प्रचंड धूळ डोळ्यात साचते. राष्ट्रीय महामार्गांसह जिल्ह्यातील इतर मार्गांची स्थिती अत्यंत बिकट आहे. महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी विविध पक्ष, संघटनांनी निवेदने व आंदोलने करून सुद्धा खड्डे मात्र जैसे-थेच असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

नाशिक - पावसामुळे नाशिकमध्ये रस्त्यांना खड्डे पडले असून पावसाळा संपत आला तरी खड्डे मात्र 'जैसे थे'च आहेत. यामुळे वाहनधारक हैराण झाले असून खड्यांमुळे अपघातही घडत आहेत. महानगरपालिकेचे दुरुस्तीकडे लक्ष नाही. पावसामुळे नाशिक महानगरपालिकेने केलेल्या रस्त्यांच्या कामांची पोलखोल झाली आहे. त्र्यंबक रस्ता, कॉलेज रस्ता, एम.जी रस्ता भाग वगळता शहरातील सर्वच रस्त्यांची चाळण झाली आहे. काही भागातील कॉलनी रस्ता आणि वर्तुळाकार (रिंग रोड) मार्गावरून वाहने घेऊन जाताना वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तसेच अनेक रस्त्यांवरील लाईट बंद असल्याने अपघाताला आयते निमंत्रण मिळत आहे. महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने रस्त्यातील खड्यात मुरूम, खडी टाकून तात्पुरती मलमपट्टी केली. मात्र, एकाच प्रवासात खड्यातील मुरूम खडी बाहेर येऊन जैसे थे परिस्थिती झाली आहे. यातील बहुतांशी रस्त्यांना पाच वर्षांहून अधिक काळ झाला असून नवीन रस्त्यांसाठी महानगरपालिका बांधकाम विभाग आग्रह करत आहे.

सातारा - जिल्ह्यातील प्रमुख रस्ते पूर्णपणे उखडले गेले आहेत. जिल्ह्यातून जाणारा पुणे-बंगळुरू महामार्ग तर अनेक ठिकाणी उखडला गेला आहे. जिल्ह्यातील इंदापूर-सांगली, पोलादपूर-पंढरपूर रस्तादेखील शेवटच्या घटका मोजत आहे. अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत तर काही ठिकाणी त्याला मुरूमाचा लेप दिला गेला आहे. जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. यावर गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी तत्काळ पुणे-बंगळुरू महामार्ग दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावर काही ठिकाणी दुरुस्ती करण्यात आली. मात्र, जिल्ह्यातील इतर मुख्य रस्ते देखील अनेक ठिकाणी उखडले गेले आहेत.

बीड - मागील दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बीड शहरासह जिल्ह्यातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रस्त्याच्या मध्यभागात खड्डे असल्यामुळे रस्ता चुकवण्याच्या प्रयत्नात अपघात देखील होत असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात निर्माण झाले आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, परळी, अंबाजोगाई या तालुक्यातील अंतर्गत रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

गडचिरोली - गेल्या आठ ते पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे राष्ट्रीय महामार्गांसह जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्गांची पुरती वाट लागली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे 'खड्ड्यात रस्ता की, रस्त्यात खड्डे' अशी अवस्था असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. अपघाताचे प्रमाणही वाढले असून अनेक ठिकाणी वाहने अडकल्याने वाहतूकही विस्कळीत होत आहे. गडचिरोली-आष्टी या राष्ट्रीय महामार्गाच्या सिमेंटीकरणाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ता खोदून असल्याने या मार्गाने वाहतूक करताना चारचाकी वाहनधारकांची मोठी कसरत होत असते. तर आलापल्ली- सिरोंचा हा प्रमुख राष्ट्रीय महामार्ग पूर्णत: खड्डेमय झाला असून एका तासाच्या प्रवासाठी तब्बल दोन ते अडीच तास वेळ लागत असल्याने वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. तर पुरामुळे भामरागड तालुक्यातील अनेक रस्त्यांवरील छोटे पूल वाहून गेल्याने येथील नागरिकांना नाल्यातूनच वाहन चालवावे लागत आहे. गडचिरोली- धानोरा, आष्टी- चामोर्शी-मूल या मार्गाचे गेल्यावर्षी डांबरीकरण करण्यात आले. मात्र या वर्षीच्या पावसाळ्यात या दोन्ही रस्त्यांची पूर्णत: वाट लागली आहे.

रस्ते दुरुस्तीची कामे लवकरात-लवकर करू -

राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमधील रस्त्यांची स्थिती बिकट आहे. याविषयी रस्ते विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना राज्य सरकारकडून लवकरात-लवकर रस्ते दुरुस्तीची कामे केली जाणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

Last Updated : Sep 1, 2020, 9:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.