Superstition Act : काही लोकांचे दुकाने बंद होतील म्हणून अंधश्रद्धा कायद्याला विरोध -जयंत पाटील

author img

By

Published : Jan 23, 2023, 10:32 PM IST

Jayant Patil

अंधश्रध्दा निर्मूलन समिती कायद्यामुळे काही लोकांची दुकाने बंद होणार असतील म्हणून हा कायदा रद्द करावा अशी मागणी होत आहे. परंतु, मला हा कायदा काही वावगा आहे असे वाटत नाही. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

मुंबई : अधश्रद्धा निर्मुलन समिती हा कायदा अतिशय विचारपूर्वक व बराच अभ्यास करून विधीमंडळात पारीत केला आहे. सगळ्यांचाच विचार करून तो बनवण्यात आला आहे. त्यामुळे हा कायदा हिंदू विरोधात आहे, असे म्हणणे योग्य नाही, असही जयंत पाटील यावेळी म्हणाले आहेत. हा कायदा सर्व धर्मात असलेल्या अंधश्रद्धेच्याविरोधात आहे. तो हिंदूविरोधी नाही. आणि तसे कोणी बोलूही नये. असही जयंत पाटील म्हणाले आहेत.

'चोराच्या उलट्या बोंबा' : दिपक केसरकरांना शिवसेना व उध्दव ठाकरे यांनी मोठी संधी दिली होती. आता राष्ट्रवादीने शिवसेना फोडली की दिपक केसरकर आणि त्यांच्या कंपूने शिवसेना सोडली हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. 'चोराच्या उलट्या बोंबा' अशा ज्या म्हणी आहेत ना त्या म्हणींचा अभ्यास दिपक केसरकर यांनी करायला पाहिजे, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे. उध्दव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी काय चर्चा केली याबाबत आमच्याकडे त्याचा तपशील नाही. तपशील आल्यावर प्रतिक्रिया देऊ असे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध : अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विरोधात कोणी नाही. मात्र, तसेच करताना धर्मातील श्रद्धांवर आघात होणार नाही. याची, काळजी घ्यायला हवी. ती काळजी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यात न घेतल्याने गंभीर चुका झाल्या आहेत. त्यामुळे त्याला विरोध करण्यात येत आहे, सरकारला संयुक्त चिकित्सा समितीकडे तो अभ्यासासाठी पाठवावा लागला होता. मात्र, सरकारने त्यात मांडलेले कोणतेही आक्षेप दूर न करता (2011)मध्ये केवळ नाव बदलून, हा कायदा परत आणला आहे. त्याला महाराष्ट्र नरबळी व अन्य अमानवीय अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम असे फसवे नाव देऊन तो मंजूर करण्यात आला आहे असा आरोप साधू महंतांनी केला आहे.

कायदा सर्व धर्मियांना लागू : पहिला गुन्हा मुस्लिम भोंदुच्या विरोधात नांदेड येथे तर दुसरा गुन्हा नाशिक रोड येथे नवबौद्ध समाजातील आरोपीच्या विरोधात दाखल झालेला आहे. नंतर हिंदु आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पहिल्या शंभर गुन्ह्यांची नोंद महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ठेवली आहे. त्यात शंभरपैकी वीस घटनांमध्ये मुस्लिम व्यक्तींच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. लोकसंख्येचा विचार करता हे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे या कायद्याबाबत गैरसमज पसरविणाऱ्यांना कृतिशील उत्तर मिळाले आहे.

या विरोधात गुन्हे दाखल : नरबळी देणे अथवा देण्याचा प्रयत्न करणे, करणी, भानामती, जादूटोणा अथवा भुत उतरवण्याच्या बहाण्याने अंगाला चटके देणे, त्यासाठी जबरदस्तीने मानवी विष्ठा खाऊ घालणे, तोंडात कोंबणे, मारहाण करणे, चमत्काराचा दावा करून स्त्रीयांचे लैंगिक शोषण करणे, गुप्तधन काढण्याच्या हेतूने अघोरी प्रथांचा अवलंब करणे, दैवी शक्तींचा दावा करून महिलांना नग्नपूजा करण्यास जबरदस्ती करणे, डाकिण समजून त्रास देणे, पैशाचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने फसवणूक करणे, आदी अमानुष घटनांमुळे गुन्हे नोंद झाल्याचे दिसून येत आहे, असे अंनिसने म्हटले आहे.

हेही वाचा : साधू महंतांचे आंदोलन! अंधश्रद्धा निर्मूलन कायदा महाराष्ट्रातून रद्द करण्याची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.