राष्ट्रवादी-भाजप एकत्र येणार यात काहीच शंका नाही; शरद पवार-अमित शाह भेटीनंतर अंजली दमानियांचं ट्विट

author img

By

Published : Aug 4, 2021, 2:21 PM IST

anjali damania tweet after sharad pawar amit shah meeting in delhi

अमित शाह यांच्याकडे सहकार मंत्रालयाचा पदभार स्विकारल्यानंतर पवारांनी पहिल्यांदाच त्यांची भेट घेतली. यावेळी सहकारी साखर कारखान्यांच्या विषयावर चर्चा झाल्याचे ट्विट शरद पवार यांनी केले होते.

मुंबई - राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार यात काहीच शंका नाही, असे ट्विट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले. नवी दिल्लीत काल (मंगळवारी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तर यासोबतच याबाबत राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दौऱ्याबाबत टीका केली होती.

काय म्हणाले होते नवाब मलिक?

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नांदेड, हिंगोली आणि परभणी या तीन जिल्ह्यांचा तीन दिवसाचा दौरा जाहीर केला असून या दौऱ्यावर कॅबिनेटमध्ये जोरदार नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना, 'राज्यपाल राज्यात दोन सत्ताकेंद्र तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत', असा आरोप अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. राज्यपाल हे उत्तराखंड राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देखील होते. त्यामुळे अजूनही राज्यपालांना मुख्यमंत्री असल्याचे भास होत असल्याचा टोलाही यावेळी नवाब मलिक यांनी राज्यपालांना लगावला.

अंजली दमानियांची प्रतिक्रिया काय? -

याबाबत अंजली दमानिया यांनी ट्विट करत राष्ट्रवादीवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, जसे मिलिटरी हल्ला attack /retreat करतांना कव्हर फायर (Cover fire) देतात तोच प्रकार आपण आज पाहिला. नवाब मलिक यांची पत्रकार परिषद फक्त पवार-शाह भेटीला एक कव्हर अप (cover up) करण्यासाठी आणि बहुतेक शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दाखवायला की आम्ही भाजप विरुद्धच आहोत. मात्र, राष्ट्रवादी-भाजप एकत्र येणार यात काहीच शंका नाही, असेही पवार-शाह यांच्या भेटीनंतर अंजली दमानिया म्हणाल्या.

anjali damania tweet
अंजली दमानियांनी केलेले ट्विट

शरद पवार भेटीबाबत काय म्हणाले?

अमित शाह यांच्याकडे सहकार मंत्रालयाचा पदभार स्विकारल्यानंतर पवारांनी पहिल्यांदाच त्यांची भेट घेतली. यावेळी सहकारी साखर कारखान्यांच्या विषयावर चर्चा झाल्याचे ट्विट शरद पवार यांनी केले होते. शरद पवारांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने घेतलेल्या या भेटीत दोन मुख्य मागण्या करण्यात आल्या. ऊसाचा हमीभाव आणि साखर कारखान्याच्या आवारात इथेनॉल उत्पादनाच्या युनीटला परवानगी देण्याची मागणी करण्यात आली.

sharad pawar tweet
शरद पवारांनी केलेले ट्विट

तर काही दिवसांपूर्वीसुद्धा शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर अंजली दमानियांनी टीका केली होती. त्या म्हणाल्या होत्या की, १५ जुलैला फडणवीस आणि भुजबळ भेटतात (निरोप घेऊन?), १६ जुलैला फडणवीस दिल्लीला जातात, १७ जुलैला शरद पवार दिल्लीला जाऊन मोदींना भेटतात. महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं आता बघवत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

anjali damania tweet
काही दिवसांपूर्वी अंजली दमानियांनी केलेले ट्विट

काही दिवसांपूर्वी मोदींची घेतली भेट -

मागच्या महिन्यातच शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. पंतप्रधान कार्यालयाने ट्वीटच्या माध्यमातून या भेटीची माहिती देण्यात आली होती. ही सदिच्छा भेट असल्याचे राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले होते. मोदींसोबतच्या भेटीनंतर जवळपास 17 दिवसांनंतर ते अमित शाह यांची भेट घेतली. तसेच पवार आणि राजनितिक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यातही बैठक झाली होती. या भेटीसत्रांनंतर अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी-भाजप एकत्र येणार यात काहीच शंका नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.