Sanjay Raut : सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावरून खासदार संजय राऊत यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

author img

By

Published : May 23, 2023, 6:46 PM IST

Sanjay Raut Criticizes Modi

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावरून खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. नवीन इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे, अशी मागणी विरोधी पक्षाने केली आहे. त्यामुळे देशातील वातावरण तापले आहे. उद्घाटन प्रसंगी राष्ट्रपती नसतील तर, ही गंभीर बाब नसून हास्यास्पद बाब आहे. संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी केले पाहिजे असे राऊत म्हणाले.

मुंबई : संसदेच्या नवीन इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. 28 मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. संसदेच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरुवारी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. यासोबतच या वास्तूचे उद्घाटन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. मात्र, या नवीन इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे, अशी मागणी विरोधी पक्षाने केली आहे. त्यामुळे देशातील वातावरण तापले आहे. दुसरीकडे, पंतप्रधानपदासाठी शरद पवार यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत असून, विरोधी पक्षात त्याची चर्चा सुरू आहे. यासोबतच जयंत पाटील हेही ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. या सर्व विषयांवर शिवसेना ठाकरे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाबाबत प्रश्न विचारला असता खासदार संजय राऊत यांनी पुढील प्रमाणे प्रतिक्रिया दिली आहे.

सेंट्रल व्हिस्टाची गरज नव्हती : 'देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. राहुल गांधींच्या मुद्द्याशी मी सहमत आहे. उद्घाटन प्रसंगी राष्ट्रपती नसतील तर, ही गंभीर बाब नसून हास्यास्पद बाब आहे. संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी केले पाहिजे. पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष नंतर येतात. निवडणुकीसाठी प्रत्येक गोष्टीचे राजकारण करावे लागते. फक्त आम्ही आणि मी पणाचा हा गोंधळ आहे. सेंट्रल व्हिस्टाची गरज नव्हती. इटली, इतरत्र आमच्यापेक्षा जुन्या इमारती आहेत.' - संजय राऊत, राज्यसभा खासदार

उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार : पुढे बोलताना खासदार राऊत म्हणाले की, 'राजकीय हव्यासापोटी आम्ही हा इतिहास घडवला. आम्ही नवीन दिल्ली बनवली. त्यासाठी लाखो रुपये, जनतेचा पैसा खर्च केला. यामुळे राष्ट्रपतींचा अवमान होत आहे? या सर्वोच्च पदाचा अपमान आहे. गेल्या 9 वर्षात राष्ट्रपदी पदावर अशी व्यक्ती बसवली आहे, जो काही बोलणार नाही. विरोधकांनी या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही त्यात सहभागी होऊ. संसदीय लोकशाहीसाठी हे घातक आहे. हा देशातील सर्वोच्च सोहळा असेल. त्यात राष्ट्रपतींचा समावेश होणार का? निवडणुका आल्या की आदिवासींचा मुद्दा पुढे आणणार. भाजप राजकारण आणि निवडणुकाचा 24 तास 365 दिवस विचार करीत आहे. देशाच्या समस्यांशी भाजपचा काहीही संबंध नाही.' अशी टीका राऊत यांनी केली आहे.

पंतप्रधानपदासाठी शरद पवारांचे नाव : देशात वाद सुरू असतानाच 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊ लागले आहेत. पंतप्रधानपदासाठी शरद पवार यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दुसरीकडे, शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे जयंत पाटील केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. याबाबत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, 'विरोधकांनी पंतप्रधानपदाचा विचार न करता प्रत्येक राज्यात भाजपला विरोध करण्याची रणनीती ठरवावी. ते आमच्यासोबत आले नाहीत, तर आम्ही ईडीला अडचणीत आणू. जयंत पाटील यांच्याबाबतही तेच होत आहे. या देशात लोकशाही कुठे आहे? केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात लोक तुमच्यापुढे झुकणार नाहीत. प्रत्येक घटक पक्ष जयंत पाटील यांच्या मागे उभा आहे." अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

हेही वाचा -

  1. UPSC Result 2022 Declares : युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर; टॉप पाचमध्ये मुलींचाच नंबर, 'असा' पाहा निकाल
  2. Manohar Joshi Admitted : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी रुग्णालयात दाखल ; उद्धव ठाकरे हिंदूजा रुग्णालयात रवाना
  3. Ajit Pawar On Bjp : वर्षानुवर्षे परंपरा चालु आहे, त्यात जातीय तेढ निर्माण करू नका - अजित पवार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.